बसस्थानकावरून शहराच्या पूर्वेकडील भागातील कॉलनी मध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे. नेहरूनगरच्या पुढे फरशीवरील उतारावर रस्ता तुटल्याने अनेक वाहनधारकांचे अपघात झाले आहेत. तसेच फरशीवर ही मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात मोठ्या समस्यांचा सामना वाहनधारकांना व पायी चालणाऱ्यांना करावा लागतो. जोपर्यंत नागरिक तक्रार करत नाहीत तोपर्यंत नगरपंचायतचे डोळे उघडत नाहीत हा अनेक वर्षांपासूनचा अनुभव आहे. वास्तविक शहरातील या समस्यांचे निराकरण नगरपंचायतने त्वरित करायला हवे. परंतु नगरपंचायतकडे तक्रार करूनही समस्यांचे त्वरित समाधान होत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता ‘जैसे थे’ परिस्थितीत आहे. रस्ते चकाचक झाले, परंतु आजूबाजूला वाढणारे काटेरी झुडपे कधीही काढले जात नाहीत. तरी ते त्वरित काढण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु हे कामे जसे काही नगरपंचायतीचे नाहीत अशा पद्धतीने नगरपंचायतचा कारभार सुरू आहे. कोरानाच्या नावाखाली व्यावसायिकांना काटेकोर नियम पाळावे लागतात किंवा तशी सक्ती केली जात आहे. परंतु नगरपंचायतचे कर्तव्य मात्र स्वतः विसरली आहे. नागरी समस्यांच्या बाबतीत नगरपंचायतीने पावसाळ्यात तरी सजग व सतर्क राहायला हवे नागरिकांच्या तक्रारींची वाट न बघता शहरातील समस्यांचे निराकरण व्हावे ही नागरिकांची रास्त अपेक्षा आहे
फरशी रस्त्याची त्वरित दुरुस्त करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST