शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात ‘शिवशाही’साठी प्रवाशांना धरले जाते वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:26 IST

नाशिकसाठी बायपास साधी बस लवकर लागत नाही : प्रवाशांना ताटकळत राहावे लागते

ठळक मुद्देमहामंडळातर्फे नाशिकसाठी शिवशाही सुरूत्यासाठी परिवर्तनच्या फेºया कमी केल्याशिवशाहीचे पूर्ण सीट झाल्याशिवाय साधी बस लावत नाही

आॅनलाइन लोकमतधुळे : प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्यासाठी सुरू केलेल्या ‘शिवशाही’ बसचे अनेक प्रवाशांनी  स्वागत केले. मात्र नाशिकसाठी सुरू केलेली बायपास   ‘शिवशाही’ बसचे प्रवासी पूर्ण झाल्याशिवाय साधी (लाल) बस लागतच नसल्याने, प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उत्पन्नवाढीसाठी एस.टी. महामंडळ एकप्रकारे  प्रवाशांना वेठीस धरत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.‘शिवशाही’ सोबतच ‘परिवर्तन’ ची बससेवाही सुरळीत ठेवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.खासगी बससेवेच्या स्पर्धेला  तोंड देण्यासाठी एस.टी. महामंडळाने विविध मार्गावर अत्याधुनिक, वातानुकूलित  अशी  ‘शिवशाही’ बससेवा सुरू केली. मुंबई, पुण्यासाठी ही वातानुकूलित बससेवा सुरू झाल्याने, प्रवाशांनी या बससेवेचे स्वागत केले. ‘शिवशाही’मुळे खासगी बसकडे गेलेला प्रवासी पुन्हा महामंडळाच्या बसकडे आकर्षिला गेला.नाशिकसाठी सक्ती नकोया परिसरातून नाशिकला जाण्यासाठी थेट रेल्वेसेवा नसल्याने प्रवासी बसनेच प्रवास करीत असतात. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, महामंडळाने पाच वर्षांपूर्वी मालेगाव बायपास धुळे-नाशिक बससेवा सुरू केली. सुरवातीला वाहकासह जाणाºया या बसला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. नंतर ही बस विनावाहक धावू लागली. अवघ्या तीन तासात ही बस नाशिकला जात असल्याने, तसेच गाडीत जागा मिळविण्यासाठी कटकट नसल्याने प्रवाशांचा ‘बायपास’ला चांगला प्रतिसाद मिळू लागला.  यात नाशिक व धुळे आगाराच्या प्रत्येकी २७-२७ फेºया होत होत्या. अर्ध्या-अर्ध्या तासाने नाशिकसाठी बायपास बस उपलब्ध होत होती.मात्र आता महामंडळाने या मार्गावर ‘शिवशाही’ बायपास बस सुरू केली. यासाठी साध्या बसच्या काही फेºया रद्द करण्यात आल्या आहेत. या बसला प्रवाशांचा विरोध नाही. मात्र सक्तीला विरोध आहे.प्रवासी भाड्यात तफावतएक शिवशाही बस व एक परिवर्तन (लाल) बस असे धुळे आगाराचे नियोजन आहे. मात्र ‘शिवशाही’ व परिवर्तन बस यांच्यातील प्रवासी भाड्यात मोठी तफावत आहे. ‘शिवशाही’साठी नाशिकचे भाडे २६४ रुपये आकारण्यात येत. तेच साध्या बससाठी १७६ रुपये लागतात. म्हणजे दोन बसच्या प्रवासी भाड्यात थोडी-थोडकी नव्हे तर ८८ रुपयांची तफावत आहे. ही तफावत प्रवाशांना रूजलेली नाही.प्रवाशांना ताटकळत राहावे लागतेबायपास शिवशाही बसचे प्रवासी पूर्ण झाल्याशिवाय  दुसरी लाल बस बायपास स्थानकात लागत नाही. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. अनेकांना वेळेत नाशिकला पोहचायचे असते. मात्र साधी बायपास बस लवकर लागत नसल्याने, प्रवाशांना ताटकळत उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो. पूर्वी अर्ध्या-अर्ध्या तासाला साधी बायपास बस लागायची. आता मात्र तास, दीडतास वाट पहावी लागते. एस.टी. महामंडळाने शिवशाही सोबतच साधी बसदेखील लावावी अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे.