लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असून पोलीस दलात सुधारणा आवश्यक आहेत, मात्र त्यांच्या कामगिरीवर अंशत: समाधानी आहे असे शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ़ नीलम गोºहे यांनी धुळयात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले़विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटूंबियांना २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला मिळायला हवा़ पण जर धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली नसती तर सरकारने त्यांना पुरेसा मोबदला दिला असता का? असा प्रश्न गोºहे यांनी उपस्थित केला़ तसेच सर्व प्रकारच्या भूसंपादनांसाठी मोबदल्याचा नियम सर्वांसाठी समान असायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले़ शेतकºयांचा विरोध असेल तर प्रकल्पच होताच कामा नये़ सरकारने महिलांच्या प्रश्नावर देखील संवेदनशिलता दाखविण्याची गरज आहे़ त्याचप्रमाणे पोलीस दलात सुधारणा आवश्यक आहेत़ गेल्या दोन-तीन वर्षात गुन्हा सिध्दीचे प्रमाण वाढले असले तरी दुसरीकडे भाजपच्याच राजकीय दबावामुळे पोलीस यंत्रणा खिळखिळी होत असल्याची टीका नीलम गोºहे यांनी केली़ भूसंपादनाच्या प्रक्रियेत सक्रिय असणाºया दलालांवर कारवाई झाली पाहिजे़ महसूल यंत्रणेचे ‘लॅण्ड आॅडिट’ झाले पाहिजे अशा मागण्या देखील आमदार डॉ़ नीलम गोºहे यांनी पत्रकार परिषदेत केल्या़ यावेळी माजी आमदार प्रा़ शरद पाटील, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळूंखे, कविता क्षीरसागर, हेमा हेमाडे, सुनिल बैसाणे उपस्थित होते़