जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २७ हजार ७६० जणांना लागण झाली आहे. पहिल्या लाटेत लहान मुलांची संख्या खूप कमी होती. परंतु डिसेबर महिन्यापासून लहान मुलांमध्येही कोरोनाचे लक्षणे दिसू लागली आहेत. पहिल्या व दुसऱ्या टप्यात ० ते पाच वयोगटातील आतापर्यंत ३० लहान मुलांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. तर ६ ते १८ वर्षे वयोगटातील ३५० मुलांना कोरोनाची लागण झालेली आहे. जानेवारी महिन्यापासून लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही जास्त आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एका व्यक्तीस कोरोना झाल्यानंतर त्याच्या संपर्कामुळे संपूर्ण कुटुंबालाच कोरोना होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पालकांनी कोरोना काळात मुलांची काळजी घ्यावे, जेणेकडून मुलांना बाधित होण्यापासून वाचविता येईल.
पालकांनो, लहान मुलांना जपा; कोरोनाचा धोका वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST