संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त येथील न्हावी गल्लीत झालेल्या कार्यक्रमात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी जि.प. प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी, पं.स. सदस्य चेतन चौधरी, रमणिक जैन, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आर.के. माळी, ग्रा.पं. सदस्य मोहन सैंदाणे, विशाल कासार, लखन ठेलारी, शफियोद्दीन पठाण, रवींद्र बडगुजर, इरफान कुरेशी, राहुल देशमुख, केदारेश्वर मोरे, समाधान पाटील, आरिफ पठाण, अल्ताफ हाजी, शाम माळी, ग्रा.पं.चे माजी सदस्य पराग देशमुख, रवींद्र माळी, भाजपचे शहर अध्यक्ष साहेबराव बिरारी, राजेंद्र पाडवी, सुनील माळी, उमेश पाटील, जितेंद्र पाटील, रोशन जैन, जितेंद्र बागूल आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन ग्रा.पं.चे माजी सदस्य किशोर पावनकार यांनी केले. त्यानंतर संत सेना महाराजांची मूर्ती व प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान जागोजागी पूजन व आरती करण्यात आली. ही मिरवणूक गावातील गांधी चौक, ग्रामपंचायत चौक, रथगल्ली, कासारगल्ली, बाजारपेठ आदी प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत नाभिक समाज बांधव व महिला सहभागी झाले होते.
संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त सोनगीरला पालखी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST