शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 22:24 IST

‘कोरोना’ची ऐशी-तैशी : मास्क न वापरताच वाढतोय वावर, कारवाई करायलाच हवी

धुळे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना मात्र नागरिकांकडूनच नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समोर आले आहे़ रिक्षात किती प्रवासी असावेत, दुचाकीवर किती याचे नियम लावून दिलेले असतानांना त्याकडे कानाडोळा करुन बिनधास्तपणे वावर सुरु आहे़ याकडे पोलिसांनी लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे़कोरोनाच्या अनुषंगाने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला होता़ त्यात अत्यावश्यक सेवा सुविधा वगळण्यात आलेल्या होत्या़ जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरीकांना सूट देण्यात आलेली होती़ त्याचा काही जण गैरफायदा घेताना दिसत आहे़ असे असताना काही जण दुचाकी घेऊन किराणा किंवा अन्य काही वस्तू घेण्याचा खोटा बहाणा करत असतात आणि विनाकारण घराबाहेर पडतात असे देखील दिसून येत आहे़ लॉकडाऊनच्या काळात कितीतरी प्रमाणात निर्बंध लावण्यात आले होते़ त्या तुलनेत अनलॉकच्या काळात त्यात सुट दिली असलीतरी काही नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहेत़ मात्र, त्या नियमानुसार न वागता बिनधास्तपणे आणि कोणाचीही मुलाईजा न बाळगता अनेकांचा वावर असल्याचे समोर येत आहे़रिक्षामध्ये अधिक प्रवाशीरिक्षांना बंदी घालण्यात आली होती़ आता ही बंदी उठविली असलीतरी त्यात किमान किती प्रवासी असावेत असे काही निर्बंध आहेत़ त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असताना मात्र त्याकडे रिक्षाचालकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे़ रिक्षांमध्ये किमान दोन प्रवासी आणि चालक इतकेच बसलेले असावेत़ असे असताना रिक्षामध्ये मागे तीन आणि चालकाच्या शेजारी एक असे प्रवासी प्रवास करताना काही ठिकाणी दिसत आहेत़ यांच्यावर कारवाई होणार का, हा प्रश्न आहे़ट्रीपल सीटचा प्रवासदुचाकीवरुन शहरात प्रवास करीत असताना किमान एक अथवा दोन जणं असताना मात्र तीन जणांकडून प्रवास होताना काही ठिकाणी दिसून येत आहे़ यात मुली देखील मागे राहिलेल्या नाहीत़ ट्रीपल सीट प्रवास करु नये, अपघाताचा धोका संभवू शकतो, असे असताना सर्रासपणे ते ही गर्दीच्या चौकातून बिनधास्तपणे ट्रीपल सीटचा प्रवास सुरु असल्याचे दिसत आहे़ संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे़अडीच लाखांवर दंडशहरात अधिक प्रवासी घेऊन फिरणाऱ्या रिक्षा आणि ट्रीपल सीट दुचाकीस्वार असे मिळून १ हजार २५२ वाहनधारकांकडून २ लाख ५० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे़ कारवाईचे सत्र वेळोवेळी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले़शहर वाहतूक शाखेकडून वेळोवेळी कारवाई सुरु आहे़ ट्रिपल सीट आणि रिक्षांवर अधिक प्रवासी बसून प्रवास करीत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरु आहे़ संबंधित वाहनधारकांनी नियमांचे पालन करायला हवे़- राजकुमार उपासे,पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, धुळे

टॅग्स :Dhuleधुळे