शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आमचे पेहलवान तय्यार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 15:55 IST

देवेंद्र फडणवीस : विरोधक मात्र कुठेय, नेर येथील सभेतून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात तेल लावून आमचे पेहलवान तय्यार आहेत़ मात्र, यात विरोधक कुठे दिसत नाही अशी टिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे तालुक्यातील नेर येथील सभेत केली़ राज्याच्या प्रचाराचा शुभारंभही त्यांनी या सभेच्या माध्यमातून केला़ धुळे ग्रामीण मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते़ यावेळी उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्यासह खासदार डॉ़ सुभाष भामरे, मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भूसे, मनोहर भदाणे, राम भदाणे, माजी आमदार द़ वा़ पाटील यांच्या पत्नी सुशीला भदाणे यांच्यासह अन्य उपस्थित होते़ मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाजनादेश यात्रा तीन टप्यात आटोपल्यानंतर आता प्रचाराचा शुभारंभ धुळे ग्रामीण उमेदवाराच्या प्रचार सभेतून होत आहे़ हा शुभारंभ आमच्या मतदार संघातून करावा यासाठी राज्यातून ठिकठिकाणाहून आग्रह सुरु होता़ परंतु मताधिक्य सर्वाधिक मिळेल असा विश्वास असल्याने येथून हा शुभारंभ करत आहे़ते म्हणाले, काँग्रेस आघाडीची अवस्था फार बिकट होत आहे़ राहुल गांधी विदेश दौºयावर गेले आहेत़ पवारांची राष्ट्रवादी निम्मी रिकामी झाली आहे़ उर्वरीत मतदानानंतर ती रिकामी होईल, असं वाटतं़ सुशीलकुमार शिंदे म्हणतात मी थकलो आहे़ या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसचे विलिनीकरण होऊ शकते अशी चिन्हे आहेत़ गेल्या १५ वर्षात काँग्रेस आघाडीची असलेली कामे पाहता आमच्या पाच वर्षात त्या पटीने कितीतरी विकासाची कामे आम्ही मार्गी लावली आहेत़ त्या जोरावरच मते मागायला पुन्हा आम्ही आलो आहोत़ असेही मुख्यमंत्री म्हणाले़ काँग्रेस आघाडीने तयार केलेल्या जाहीरनाम्याचा समाचार घेतला़ 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक