शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गर्दीमुळे व्यापारी संकुले बंद करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 19:06 IST

व्यापाऱ्यांचा विरोध : आमदारांसह प्रशासनाकडे धाव

धुळे : दुकानदारांसह ग्राहक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत नसल्याने महानगरपालिकेच्या मालकीची व्यापारी संकुले बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध करीत व्यापाºयांनी गुरूवारी आमदारांसह जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली आणि दुकाने सुरू करण्याची मागणी केली़कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे अडीच ते तीन महिने दुकाने बंद होती़ व्यापाºयांचे नुकसान होवू नये म्हणून तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’च्या माध्यमातून शासनाने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली़ जिल्हाधिकाºयांना प्राप्त अधिकारांमुळे धुळे शहरात आठ दिवस उशिराने परवानगी मिळाली़ परंतु बाजारात आणि दुकानात सातत्याने गर्दी होवू लागली आणि त्यानंतर शहरात कोरोनाचा संसर्ग देखील वाढला़ त्यामुळे परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका क्षेत्रामध्ये झोनल अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली़ झोनल अधिकाºयांनी बाजारात फेरफटका मारुन परिस्थितीची पाहाणी करावी, फोटो आणि व्हीडीओ चित्रीकरणासह वस्तुस्थितीचा अहवाल दर तीन तासांनी सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते़ त्यानुसार झोनल अधिकारी गेल्या आठवड्यापासुन परिस्थितीची पाहणी करीत होते़महानगरपालिकेच्या ताब्यातील व्यापारी संकुलांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही, दुकानदार नियम पाळत नाहीत, सम विषमचा नियम न पाळत दुकाने सुरू आहेत, त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांना जिल्हाधिकाºयांना दिला़ त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी महानगरपालिकेच्या ताब्यातील व्यापारी संकुले बंद करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार गुरूवारी महापालिकेच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने व्यापारी संकुलांमधील सर्व दुकाने बंद केली़दरम्यान, व्यापाºयांनी आमदार फारुक शाह, जिल्हाधिकारी संजय गायकवाड, आयुक्त अजीज शेख यांच्याकडे दुकाने सुरू करण्याची मागणी केली़ व्यापाºयांनी दुपारी आमदारांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाºयांची भेट घेवून चर्चा केली़ यावेळी गोपाल माने, कमल लुंड, भरत बजाज, प्रशांत चावडा, भुषण कटारीया, देवा खीलवाणी, पवन माधवाणी यांच्यासह इतर व्यापारी उपस्थित होते़व्यापारी संकुलांमध्ये गर्दी होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून बंदचे आदेश दिले आहेत़ मनपा आयुक्तांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले़ प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले़ही संकुले बंद दोन दुकानांवर कारवाई४महानगरपालिकेच्या मालकीचे गरुड कॉम्प्लेक्स, डॉ़ सर्वपल्ली राधाकृष्णन कॉम्प्लेक्स, प्रबोधनकार ठाकरे संकुल, नाशिककर संकुल, बुरहानी आणि तोलाणी कॉम्प्लेक्स आदी व्यापारी संकुले बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ दरम्यान, नियम न पाळणाºया दोन दुकानांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़गरूड कॉम्प्लेक्समधील मोबाईलच्या दुकानांवर दिवसभर गर्दी असते़ या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही़ त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे़ परंतु सर्व नियमांचे पालन केले जात असून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी़ नियम न पाळणाºया दुकानांवर कारवाई करावी, असे व्यापाºयांनी जिल्हाधिकाºयांना सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे