शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध पित्यास 18 हजार पोटगीसह सुसज्ज निवारा देण्याचे आदेश

By admin | Updated: January 14, 2017 00:08 IST

वृद्ध पित्यास त्याच्या तिन्ही मुलांनी मिळून दरमहा 18 हजार रु.ची पोटगी द्यावी, असा आदेश धुळे उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी नुकताच दिला.

धुळे : शहरातील देवपूर भागातील जयहिंद कॉलनीतील रहिवासी वृद्ध पित्यास त्याच्या तिन्ही मुलांनी मिळून दरमहा 18 हजार रु.ची पोटगी द्यावी, असा आदेश धुळे उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी नुकताच दिला. अर्ज दाखल केल्यापासून केवळ तीन महिन्यात हा निकाल देण्यात आल्याने वृद्ध पित्यास मोठा दिलासा मिळाला आहे.तक्रार अर्जानुसार, जयहिंद कॉलनीतील रहिवासी शंकरराव नारायण देवरे यांना त्यांची मुले भूषण देवरे, प्रशांत देवरे व नितीन देवरे यांनी दमदाटी व शिवीगाळ करत त्यांच्या मालकीच्या घराबाहेर काढण्याचा प्रय} केला. परंतु ते तेथेच राहिले. मोठय़ा व मधल्या मुलाने मिळून त्यांना मृत्यूपत्र लिहिण्यास भाग पाडले. दोन नंबरच्या मुलाने जयहिंद संस्थेच्या सभासदत्वाचा राजीनामा लिहून घेतला. तसेच त्या जागेवर स्वत: सभासद बनला.  देवरे यांना कोणताच निवारा न उरल्याने ते निराश्रीत झाले. नातेवाईक व मित्रमंडळीकडे काही दिवस काढले. परंतु त्यांना कोणताही निवारा नसल्याने ते जयहिंद कॉलनीतील त्यांच्या प्लॉट क्र.177 येथील घरी गेले. परंतु  प्रशांत याने, तुमचा या घराशी काही संबंध व हक्क नसल्याचे सांगून त्यांना हाकलून लावले. तसेच त्यांच्या स्वकष्टार्जित इस्टेटीमधून वाटणी मागण्याचा दिवाणी दावा टाकून त्रास देण्याचा प्रय} केला. त्यामुळे शंकरराव देवरे यांनी सकष्टार्जित इस्टेटीमधून कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने प्रतिवादी तिघा मुलांकडून प्रत्येकी 10 हजार रु. उदरनिर्वाहासाठी पोटगी व न्याय मिळण्यासाठी  धुळे उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यात मोठय़ा मुलाचे उत्पन्न 6 लाख, मधल्या मुलाचे 12 लाख व धाकटय़ा मुलाचे उत्पन्न 4.5 लाख असल्याचे नमूद केले.या प्रकरणात दोन्ही बाजूंना म्हणणे मांडण्यासाठी नोटीस दिली होती. सुनावणीवेळी मोठय़ा मुलाने 4 हजार, दोन नंबरच्या मुलाने 2 ते अडीच हजार व लहान मुलाने 2 हजार रु. देण्याची तयारी न्यायाधिकरणासमोर दर्शविली. 2 रोजी उपविभागीय अधिकारी मिसाळ यांनी निर्णय दिला. त्यानुसार भूषण देवरे यांनी 8 हजार, मधला मुलगा प्रशांत याने 6 हजार व लहान मुलगा नितीन देवरे याने 4 हजार  रुपये असे मिळून 18 हजार रुपये दरमहा बॅँक खात्यात 5 तारखेर्पयत जमा करावे, जयहिंद कॉलनीतील बंगल्यात टॉयलेट, बाथरूम व टीव्ही संच असलेली सुसज्ज रूम देण्याचे आदेश दिले. आदेश न पाळल्यास एक महिना कारावासाची शिक्षा देण्यात येणार येईल, असेही नमूद आहे.