शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

उघडय़ावर शौचास बसणा:या 10 जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 00:14 IST

उघडय़ावर शौचास बसून अस्वच्छता व आरोग्यास बाधा निर्माण करणा:या दहा जणांच्या विरोधात दोंडाईचा नगरपालिकेच्या गुड मॉर्निग पथकाने शुक्रवारी पहाटे कारवाई केली आहे.

दोंडाईचा : स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत उघडय़ावर शौचास बसून अस्वच्छता व आरोग्यास बाधा निर्माण करणा:या दहा जणांच्या विरोधात दोंडाईचा नगरपालिकेच्या गुड मॉर्निग पथकाने शुक्रवारी पहाटे कारवाई केली आहे. या दहाही जणांना पथकाने दोंडाईचा पोलीस स्टेशनला नेऊन त्यांच्या विरोधात प्रत्येकी 100 रुपयाच्या दंडाची आकारणी करून त्यांना तंबी देण्यात आली आहे. बुधवारी न.पा.च्या गुड मॉर्निग पथकाने शहरातील विविध परिसरात फिरून उघडय़ावर शौचास बसणा:या 104 जणांच्या विरोधात गांधीगिरी पद्धतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार केला होता. या वेळी तंबी देऊनही नागरिक ऐकत नसल्यामुळे शुक्रवारी पहाटे पुन्हा कारवाई करण्यात आली. नगराध्यक्षा नयनकुवर रावल, आरोग्य सभापती वैशाली महाजन यांच्या मार्गदर्शनखाली गुड मॉर्निग पथकाची स्थापना केली आहे. शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास या पथकाने पोलिसांच्या मदतीने शहरातील म्हाळसानगर, चैनी रोड, मांडळ चौफुली, अमरावती नदी पात्र या ठिकाणी पाहणी केली. तेथे उघडय़ावर शौचास बसणा:यांच्या विरोधात कारवाई केली आहे. तसेच यापुढे उघडय़ावर शौचास बसू नका, अशी तंबीही दिली आहे. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी रोहिदास वारूडे, पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे, आरोग्य कर्मचारी शरद महाजन, कांतीलाल मोहिते, राजेंद्र चौधरी, नीलेश लोट उपस्थित होते.