शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

केवळ २६ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक!

By admin | Updated: May 24, 2017 00:21 IST

पाटबंधारे विभागाची मनपाला नोटीस : पाण्याच्या नियोजनासह पाणीपट्टी भरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराच्या ४० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाºया नकाणे तलावात केवळ २६ दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असून मनपाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे १ कोटी ८४ लाख रुपयांची पाणीपट्टी भरावी, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने मनपा प्रशासनाला बजाविली आहे़ केवळ २६ दिवसांचा साठामहापालिका क्षेत्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ त्यामुळे मनपाचा पाणी वापरदेखील वाढत असून दररोज मनपाकडून अधिक पाणी उचलले जाते़, त्यावर पाटबंधारे विभागाने यापूर्वीदेखील आक्षेप घेतला आहे़ दरम्यान, मनपाच्या अधिक पाणी वापरामुळे सद्य:स्थितीत नकाणे तलावात केवळ १़४६ दलघमी (५१़५६ दलघफू) पाणीसाठा शिल्लक आहे़ मनपा  दररोज २ दलघफू पाणी वापरत असल्याने सद्य:स्थितीत केवळ २६ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन करून काटकसर आवश्यक असल्याचे पाटबंधारे विभागाने दिलेल्या नोटिसीत नमूद आहे़तर पुन्हा पाणीटंचाईपावसाळा सुरू होण्यास काही दिवस उरले असले, तरी दरवर्षीचा अनुभव पाहता जून महिन्यात पाऊस होईलच; याची शाश्वती नसते़ त्यामुळे वेळेवर पाऊस न झाल्यास शहराला पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो़ काही दिवसांपूर्वी जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती़ त्यातच आता नियोजन न झाल्यास जून महिन्यात पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो़ थकबाकीचेही स्मरणपाटबंधारे विभागाची पाणीपट्टी न भरल्याने जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस नकाणे तलावाचा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाने खंडित केला होता़ त्यानंतर मार्चमध्येही मनपाला सातत्याने नोटिसा बजाविण्यात आल्याने जवळपास ५० लाख रुपयांचा भरणा मनपाने यापूर्वी केला आहे़ तरीदेखील अजून १ कोटी ८४ लाख १३ हजार रुपये पाणीपट्टीची थकबाकी असून ती तत्काळ भरण्यात यावी, असेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे़अक्कलपाडातून पाण्याची मागणी़़़अक्कलपाडा प्रकल्पातून नकाणे तलावात पाणी सोडण्यात यावे, यासाठी मनपाकडून जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला असला, तरी त्यासाठी पाठपुरावादेखील आवश्यक आहे़ शहरात निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईस जबाबदार धरून मनपा प्रशासनाने पाच अभियंत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता़ त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन तत्काळ करावे लागणार आहे़