आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या १३८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत केवळ १०६ अर्ज दाखल झाले. काही ग्रामपंचायतींसाठी अर्जच दाखल झाले नाही. मात्र कोणकोणत्या गावातून अर्ज दाखल झालेले नाही, याची यादी तयार करण्याचे काम सुरू होते.आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१९ या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यात धुळे जिल्ह्यातही एकाही ग्रामपंचायतीची मुदत या काळात संपत नाही. मात्र अपात्रता, जात प्रमाणपत्र रद्द होणे, निधन होणे, राजीनामा देणे आदी विविध कारणामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या जागाांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.यात शिंदखेडा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या ८५ जागा, साक्री तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या २९ जागा, शिरपूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या २३ व धुळे तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.१६ ते २१ नोव्हेंबर दरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर साक्री तालुक्यातून २७, शिंदखेडा तालुक्यातून ४३, शिरपूर तालुक्यातून ३४ व धुळे तालुक्यातील अंबोडे गावाच्या ग्रामपंचायतीसाठी एक असे एकूण १०६ अर्ज प्राप्त झालेले आहेत. २२ रोजी दाखल अर्जांची छाननी होणार असून, २५ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. ज्याठिकाणी एक-दोन जागा आहेत, त्या ग्रा.प. बिनविरोध होण्याची शक्यता आहे.जागांपेक्षा अर्ज आले कमी४जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायतीच्या १३८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. मात्र या पोटनिवडणुकीसाठी अनेकांनी उदासिनता दाखविली आहे. जागा १३८ असतांना केवळ १०६ अर्ज दाखल असून ३२ अर्ज कमी आलेले आहेत. दरम्यान काही गावांमधून अर्जच दाखल करण्यात आलेले नाहीत. ती गावे कोणती आहे, याची यादी करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
धुळे जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या १३८ जागांसाठी फक्त १०६ अर्ज प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 11:35 IST