शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विलगीकरणातील केवळ १.५४ टक्के रुग्णांना भासली उपचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:40 IST

गृह विलगीकरणाला चांगला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ३६ रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. त्यापैकी ४८० रुग्णांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. सध्या ५५६ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. विलगीकरण दरम्यान, केवळ १.५४ टक्के रुग्णांना उपचारांची गरज भासली असून १६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.गृह विलगीकरणात कोणाला ठेवतातकोरोनाची कोणतेही लक्षणे नसलेल्या मात्र कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला जातो. त्यासाठी घरात स्वतंत्र खोली व शौचालय असणे गरजेचे आहे. तसेच घरात काळजी घेणारी व्यक्ती असावी. एकूण १७ दिवसांचा गृह विलगीकरणाचा कालावधी असतो. विलगीकरणादरम्यान रुग्णालयाकडून रुग्णाशी वेळोवेळी संपर्क साधला जातो.विलगीकरणात काय काळजी घ्यावीविलगीकरणादरम्यान रुग्णाने एका स्वतंत्र खोलीतच राहावे. तसेच रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने मास्कचा वापर केला पाहिजे. मास्कच्या पुढील बाजूस स्पर्श करू नये. बाधित व्यक्तीला जेवण देण्यापूर्वी ४० सेकंद हात साबणाने धुवावे. तसेच बाधित रुग्णाची काळजी घेणाºया व्यक्तीने स्वत:च्या प्रकृतीचे परीक्षण केले पाहिजे व ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे जाणवल्यास कोरोनाची चाचणी करावी अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.प्रतिक्रिया-विलगीकरणाबाबत विविध माध्यमातून चांगली जनजागृती झाली आहे. विलगीकरणात असलेल्या अत्यल्प रुग्णांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.डॉ.विशाल पाटील, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी धुळे