शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भूमिअभिलेख कार्यालयात ‘ऑनलाईन’ गोंधळ

By admin | Updated: May 15, 2017 11:28 IST

दाखले घेणा:या नागरिकांना, कर्मचा:यांकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने गोंधळात अधिकच भर पडत आहे

ऑनलाइन लोकमतसाक्री, जि. धुळे, दि. 15 -  भूमिअभिलेख कार्यालयातून मिळणारे दाखले 1 मे पासून ऑनलाईन झाल्याने भूमिअभिलेख कार्यालयात ऑनलाईन गोंधळ सुरू झाला आहे. यासंदर्भात दाखले घेणा:या नागरिकांना, कर्मचा:यांकडून योग्य  मार्गदर्शन मिळत नसल्याने गोंधळात अधिकच भर पडत आहे. ‘ऑनलाईन’मुळे कामकाज सुरळीत होण्याऐवजी अधिकच किचकट होत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.ऑनलाईन दाखल्यांसाठी महाऑनलाईन  लिमिटेडकडून या सेवांचा वापर कसा करावा, याबाबत 2 ऑक्टोबर 2016 रोजी प्रत्येक जिल्ह्यातील कर्मचारी व अधिका:यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. तरीही भूमिअभिलेख कार्यालयात दाखले घेण्यासाठी नागरिक गेले तर त्यांना सरळ सेतू सेवा केंद्रावर पाठविण्यात येते. त्या ठिकाणी गेल्यावर संबंधित सेतू केंद्रावर प्रशिक्षण घेतलेला कर्मचारी हजर नसला तर तो नकार देतो. एखाद्या सेतू केंद्रावर ऑनलाईन अर्ज केल्यावर त्याला पुन्हा भूमिअभिलेख कार्यालयात यावे लागते. तेथे पुन्हा चलन दिले जाते. ते चलन घेऊन त्याला पुन्हा सेतू केंद्रावर जावे लागते.फी भरण्याबाबत गोंधळएवढे ‘दिव्य’ पार पाडल्यावर दाखल्यांसाठी किंवा मोजणीसाठी फी कुठे भरावी किंवा कोणत्या ‘हेड’खाली भरावी याची कोणतीही माहिती साक्री कार्यालयातील कर्मचा:यांना नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून लोकांना या कार्यालयाचे हेलपाटे घालावे लागत आहेत. साक्री येथील कार्यालयात कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने लोकांची अधिकच गैरसोय होत आहे. शिरपूर येथील अधिका:याकडे साक्रीचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्याने ते आठवडय़ातून कधीतरी त्यांच्या सोयीनुसार कार्यालयात येतात. तोर्पयत हे कार्यालयावर वा:यावर असते. लोकांना योग्य ते मार्गदर्शन व कर्मचा:यांकडून सौजन्यपूर्वक वागणूक मिळत नसल्याने याविषयी लोकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.नागरिकांची अपेक्षानागरिकांकडून दाखल्यांबाबत विचारणा झाल्यावर किमान कर्मचा:यांनी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र, नागरिकांना नाहक सेतू सेवा केंद्रावर पाठविले जाते. यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाया जातात.भूमिअभिलेख कार्यालयातून मिळणा:या ‘ऑनलाईन’ दाखल्यासंदर्भात आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला असून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहोत.-एम.एस. बोकीळकार्यालयीन अधीक्षक, साक्री