लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर येथील उपबाजार समितीत सोमवारी कांद्याला प्रति क्विंटल १ हजार ३५५ रुपये भाव मिळाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आठवडयात फक्त तीन दिवस कांदा खरेदी होणार असल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.अत्यावश्यक सेवेत कांदा येतो. त्यामुळे सोमवारी येथील उपबाजार समितीत आज कांदा लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली. यावेळी साठ वाहनांचा लिलाव होऊन प्रतिक्विंटल १३५५ रुपये भावाचा उच्चांक देत व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला. बाजारात सरासरी हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल भावाने व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला. लॉकडाऊनच्या काळात कांदा लिलाव सोमवार बुधवार व शनिवार या दिवशी ठेवण्यात आला आहे. कारण, व्यापाºयांना कांदा भरण्यासाठी मजूर वर्गाचा तुटवडा आहे. कारण कोरोनाच्या भीतीपोटी मजूर वर्ग घराच्या बाहेर निघण्यास तयार नाही. यामुळे आठवडयातून तीन दिवसच कांदा बाजार सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यापुढे शेतकºयांनी लिलावाला येण्यापूर्वी उपबाजार समितीत नोंद करून पास ताब्यात घ्यावी, ज्या शेतकºयांना पास मिळेल तेच वाहनााा लिलाव होईल, इतर शेतकºयांनी गर्दी करु नये, असा निर्णय सोमवारी मार्केट सचिव कर्मचारी व्यापारी यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच या संदर्भात शेतकºयांना सूचनाही करण्यात आल्या आहेत. कोरोना या संसर्गजन्य विषाणू आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासन पातळीवर विविध निर्णय होत आहे. लिलाव जेबापूर रस्त्यालगत असलेल्या जागेवर होईल. शेतकºयांनी त्याठिकाणी आपली वाहने उभी करावी.लिलाव सकाळी १० ते दुपारी एक वाजेपर्यंतच होतील, याची शेतकºयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.
कांद्याला मिळाला प्रति क्विंटल १ हजार ३५५ भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:02 IST