पिंपळनेर : येथील उपबाजार समितीत सोमवार पासून कांदा लिलाव प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.सध्या देशासह राज्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणू आजाराचा फैलाव असल्याने सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे़ याच पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सुविधेत कांदा येत असल्याने प्रशासनाच्या आदेशावरून येथील उपबाजार समितीत ३० मार्च सोमवारपासून सकाळी दहा ते एक या वेळात कांदा लिलाव होईल, यासाठी शेतकºयांना कांदा वाहन लिलावात आणण्यापूर्वी उपबाजार समितीला १२वाजेपूर्वी कळवून नोंदणीची सूचना द्यावी लागणार आहे, जे नोंदणी करतील त्यांचेच कांदा दिला जाईल़ मार्केटमध्ये विनाकारण इतर शेतकºयांनी गर्दी करु नये, ज्या शेतकºयाचा माल असेल, त्या शेतकºयांनी सोबत ओळखपत्र आधार कार्ड आणावे, तोंडाला मास्क लावून किंवा रुमाल बांधून लिलाव स्थळी उपस्थित राहावे, लिलाव एका सत्रातच होईल़यासाठी शेतकºयांनी कांदा वाहन लिलाव सुरु होण्यापूर्वी आणावे, सदर कांदा लिलाव हा जेबापूर रोड येथे होईल, शेतकºयांनी लिलाव झाल्यानंतर त्याच दिवसाचा धनादेश व्यापाºयाकडून घ्यावयाचा आहे़ तसेच रोख रक्कम दहा हजार रुपये मिळेल, तसेच कांदा लिलाव वेळी येत असतांना गावात सर्वत्र दुकाने बंद असल्याने शेतकºयांनी स्वत: सोबत पाणी तसेच जेवणाचा डबा असू द्यावा. असे आवाहन उपबाजार समितीचे सचिव अशोक मोरे, शाखाप्रमुख संजय बाबा यांनी केले.
सोमवारपासून कांदा लिलावप्रक्रिया सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 20:47 IST