राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थी व पालकांवर अन्याय करणाऱ्या संस्थाचालकांच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आता मैदानात उतरली असून, संस्थाचालकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली सुरू केली आहे. लॅाकडाऊन सुरू असताना विद्यार्थी शाळेत जात नसतानाही ऑनलाईनच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांकडून मनमानी पद्धतीने शैक्षणिक शुल्क वसूल केले जात आहे. तसेच केंद्र सरकारने व रिझर्व बँकेने शिक्षणासाठी झिरो टक्के दराने विद्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांची मागील शैक्षणिक वर्षाची फी बाकी असेल त्यांच्याकडून फी वसूल करू नये. सुविधा विद्यार्थी वापरत नाहीत, त्याची व ट्युशन फी आकारण्यात येऊ नये, अशा मागण्या विद्यार्थी संघटनेने केल्या आहेत.
एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST