शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मतदानास एक तास उशीरा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:18 IST

कापडणे येथील प्रकार : ताटकळत उभे रहावे लागल्याने मतदारांमध्ये नाराजी

लोकमत आॅनलाईन कापडणे : कापडणे येथे मतदान कर्मचाºयांच्या चुकीमुळे मतदान केंद्र क्रमांक ६९ मध्ये तब्बल एक तास उशिराने मतदानास सुरुवात झाली. यामुळे मतदारांना ताटकळत उभे रहावे लागले.कापडणे येथील एच.एस. बोरसे हायस्कूल जुनी इमारत पूर्वेकडील खोली क्रमांक-२ येथे मतदान केंद्र क्रमांक ०६/६९ या मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरुवात न होता तब्बल एक तास उशिराने सकाळी आठ वाजता मतदान करण्यास सुरुवात झाली. यामुळे मतदान करण्यासाठी आलेले वयोवृद्ध रुग्ण व अन्य मतदारांची मोठी दमछाक झाली.कापडणे येथील बोरसे  हायस्कूल मधील केंद्र क्रमांक ६९ मध्ये सकाळी सात वाजेपर्यंत मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचाºयांनी मतदानाचे नियंत्रण युनिट सीपी, व्हीव्हीपॅड यंत्र, मतदान युनिट यांची वेळेवर जोडणी न केल्यामुळे अधिकाºयांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. मतदान सुरू करण्यापूर्वी मॉक पोलनुसार ५० अभिरूप मतदान हे मतदान युनिटवर करावे लागत असल्याने हे अभिरूप केलेले मतदान व्हीव्हीपॅड मशीनमध्ये पडत असतात व अन्य सात स्लिप पडत असतात. यापैकी शेवटची सातव्या क्रमांकाची स्लीप पडण्यास अडथळा येत होता. मात्र, मॉकपोलद्वारे ५० अभिरुप झालेले मतदान व सात स्लिप ताब्यात घेऊन नियंत्रण युनिटचे क्लोज, बंदचे बटन न दाबता नियंत्रण युनिट मतदान अधिकाºयांनी पेपर सील करून टाकले. शेवटी सदर चूक लक्षात आल्यावर मतदान अधिकारी व वरिष्ठ अधिकाºयांद्वारे नियंत्रण युनिटचे पेपर सील पुन्हा ओपन करून मतदान सुरू करण्यापूर्वी घेण्यात आलेले ५० अभिरूप मतदान अधिक सात स्लिपा व्हीव्हीपॅडमधील अभिरूप स्लिपांच्या मागे स्टॅम्प मारून अधिकाºयांच्या सह्या करण्यात आल्या व नियंत्रण युनिटचे क्लोज बटन दाबून पुढील मतदान प्रक्रिया तब्बल आठ वाजेनंतर सुमारे एक तास उशिराने सुरू करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे येथील केंद्रावरील मतदान अधिकारी व कर्मचाºयांची मोठी धांदल उडाली होती.सदर मतदान केंद्रावर सकाळी लवकर मतदान करण्यासाठी मतदार आलेले होते. मात्र, सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू न होता. एक तास उशिरा मतदानास सुरुवात झाल्याने उत्साहाने आलेल्या मतदारांमध्ये नंतर नाराजीचे वातावरण दिसून आले. रुग्णाचे हालदरम्यान,  मतदान करण्यासाठी दवाखान्यातून  आलेली  वयोवृद्ध महिला देखील दुखापत झालेल्या हाताला तसेच धरून ताटकळत उभी होती. मतदान करण्यासाठी उशिरापर्यंत वाट बघावी लागल्याने मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांनी संबंधित अधिकाºयांविषयी नाराजी व्यक्त केली. माहितीचा अभाव, मतदारांचा गोंधळ  बहुतांश मतदान केंद्रात बॅलेट युनिटला आडोसा म्हणून कंपार्टमेंट तयार करण्यात आले होते. त्यावर मतदान कक्ष असा उल्लेख करण्यात आलेला होता. मात्र, त्यावरील महत्त्वाच्या बाबी ठळकपणे उशिरापर्यंतही लिहिण्यात आलेल्या नव्हत्या. त्यात राज्याचे नाव, मतदार संघाचे नाव व क्रमांक, मतदानाची तारीख, मतदान केंद्राचे नाव व क्रमांक यांची ठळक माहिती दर्शनी भागावर दिसून येत नव्हती. त्यामुळे मतदाराला मतदान केंद्राबाबत खात्री पटण्यास विलंब होत होता.

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक