शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीसह विहिरीत कोसळल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:41 IST

धुळ्यातील घटना : जवानांनी काढला मृतदेह  

ठळक मुद्देधुळ्यानजिक साक्री रोडवरील एका विहिरीत घडली घटनाविहीरीत पाणी असल्याने दुचाकीसह कौलस्कर पाण्यात बुडालेएसआरपीएफच्या जवानांनी त्यांना दुचाकीसह बाहेर काढले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दुचाकीसह ४० फूट खोल विहीरीत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना साक्री रोडवर मंगळवारी दुपारी घडली. एसआरपीएफच्या  जवानांनी त्यांना दुचाकीसह बाहेर काढले़    शहरातील साक्री रोडवर मातोश्री वृध्दाश्रम आहे़ या वृध्दाश्रमालगत रस्त्याच्या बाजुला संरक्षण कठडे नसलेली  मोठी ४० फूट खोल विहीर आहे़ विहीरीत ३५ फूट पाणी असून त्यात सात फुट गाळ आहे. या विहिरीत मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास एम.एच.१८ एएफ ४८५७ क्रमांकाची दुचाकी घेऊन जाणारे  रवींद्र सदाशिव कौलस्कर (वय ४०) रा.विकास कॉलनी हे  कोसळले. विहीरीत पाणी असल्याने दुचाकीसह कौलस्कर पाण्यात बुडाले होते.   विहीरीत पडल्याचा आवाज झाल्याने जवळच असलेल्या एका महिलेने विहीरजवळ जाऊन बघितले. तेव्हा विहीरीत कोणीतरी बुडल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच आरडाओरड केली. ते ऐकून  राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ धुळ्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहचले़    जवानांनी विहीरीत उडी घेऊन  दुचाकीसह कौलस्करांना बाहेर काढले.  परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. प्रतिसाद दलाचे नियंत्रण अधिकारी तथा समादेशक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक समादेशक एस़ ई़ पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोरे, चौधरी यांच्यासह डी़ एस़ चौरे, डमाळे, सचिन आव्हाड, पवार, गिरासे, के़ पी़ चौधरी, साळुंखे यांनी मदतकार्य केले.   या घटनेबाबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यात आला होता़ घटनास्थळी धुळे तालुका पोलीस दाखल झाले होते़