शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाख रुपयांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:22 IST

धुळे शहरातील घटना : बुधवारी पहाटेची घटना, दागिने व रोख रकमेचा समावेश

धुळे : शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी साक्रीरोडवरील कुमारनगरात एका व्यावसायिकाकडे घरफोडी करून सोन्यांचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ५८ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना २ आॅक्टोंबर रोजी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे चोरी झाली त्या घरातील सर्व सदस्य घरात होते. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे तीन ते चार चोरटे एका कारमधून साक्रीरोड परिसरात आले. सर्वप्रथम त्यांनी साक्रीरोडवरील जोशी गोंधळी कॉलनीत एक दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकान फोडत असतांना शटरचा आवाज आल्याने, काही नागरिक जागे झाले. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. पुढे कुमारनगरात असलेले मनोज रोहडा यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी काजू बदामाच्या तीन बरण्या लंपास केल्या. तसेच जवळपास १५ ते २० हजाराची रक्कम या ठिकाणाहून लंपास केली.यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा कुमारनगरातील बेकरी व्यावसायिक ठाकवणी यांच्या ‘शामजी कृष्णा’ या बंगल्याकडे वळविला. या बंगल्याच्या लोखंडीगेटला कूलूप लावलेले होते. चोरट्यांनी कटरच्या साह्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ४ लाख ८३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख ७५ हजार रूपये असा एकूण ५ लाख ५८ हजार रूपयांचा माल लंपास केला.सर्व सदस्य घरातचदरम्यान चोरीची घटना घडत असतांना ठाकवाणी यांच्या घरातील सर्व सदस्य घरातच गाठ झोपेत होते. सकाळी ७ वाजेनंतर घरच्यांच्या लक्षात घरी धाडसी चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक आर.एम. उपासे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक उगले यांनी भेट देवून पहाणी केली.याप्रकरणी जगदीश हरीराम ठाकवाणी (वय ४१, रा. ब्लॉक नं. क्यू ४, कुमारनगर, धुळे) यांच्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे