शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कन्या शाळेची जीर्ण इमारत जमीनदोस्त करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:51 IST

मालपूर : वारा, वादळ, पावसामुळे गंभीर दुर्घटना घडण्याचा धोका; शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील केंद्रीय जिल्हा परिषद कन्या शाळा नं. २ ची इमारत जीर्ण झालेली आहे. या शाळेजवळच अंगणवाडीचे वर्ग भरतात.  जीर्ण झालेल्या भिंती  पावसामुळे पडून गंभीर दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात यावी, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.मालपूर येथे केंद्रीय जिल्हा परिषदेची शाळा असून या स्वतंत्र तीन शाळा आहेत. शाळा नं. १ व कन्या शाळा नं. २ या एकाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ स्वतंत्र भरतात. पैकी कन्या शाळेची पश्चिमेकडील इमारत नादुरुस्त झाली आहे. येथे तीन वर्गखोल्या असून दोन वर्गांना नवीन पत्रा टाकला आहे. तर एका खोलीचा अर्धवट उडालेला पत्रा असून भिंती देखील जीर्ण झालेल्या आहेत.पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली आहे. मात्र अशा परिस्थितीत पाऊस जोरदार होवून वादळ वारा आला तर येथील पत्रा उडून भिंती कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या इमारतीला लागून जवळच अंगणवाड्यांचे वर्ग भरत असतात. तसेच शाळा नं. १ व २ मधील  लहान विद्यार्थ्यांचा पटांगणात सतत वावर असतो. अशापरिस्थितीत ही इमारत वादळ वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावल्यास गंभीर घटना घडून कोणाला जीव गमवावा लागल्यास अन्यथा जखमी झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न पालकवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेऊन, शाळा इमारतीची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

ही कन्या शाळा नं. २ची इमारत असून मागील वर्षी देखील पाडण्याचा प्रस्ताव दिला होता. आता पुन्हा तसा प्रस्ताव तयार करुन शिक्षण विभागाला पाठवण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देतो.- ए.जी. नगराळे, केंद्र प्रमुख मालपूर

टॅग्स :Dhuleधुळे