शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

संततधारेने घरांची पडझड, पिकांचे नुकसान, तिघांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 13:08 IST

धुळे : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे विजा कोसळून दोन बहिणींचा तर पुरात वाहून एकाचा ...

धुळे : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे विजा कोसळून दोन बहिणींचा तर पुरात वाहून एकाचा असा तिघांचा बळी गेला. अनेक घरांची पडझड व पुरामुळेही मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या काहींना वाचविण्यात यश आले़ शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तसेच वादळी वाऱ्यांनी आडव्या पडलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा पंचनाम्याच्या प्रतीक्षेत असून यंत्रणा मात्र निवडणुकीच्या कामांत व्यस्त असल्याचे चित्र आहे.पावसाची दमदार हजेरीविजांच्या कडकडटासह जोरदार पाऊस झाला आहे़ गुरुवारी २४ तासांत १४६ मि.मी. पावसाची नोंद झाली़ शिरपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली़ त्याखालोखाल शिंदखेडा तालुक्यात एकाचा दिवसात ४३ मि.मी़ पावसाची नोंद झाली़ चार दिवसांच्या संततधार पावसानंतर शनिवारी सकाळी सुर्याचे दर्शन झाले़धरणांमधून विसर्ग सुरूचपाऊस जिल्ह्यात सर्वदूर होत असल्यामुळे अमरावती मध्यम प्रकल्प, मालनगाव, लाटीपाडा, जामखेलीसह अक्कलपाडा धरण ओसंडून वाहत आहे़ परिणामी नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत़ नदी काठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेला आहे़ काही ठिकाणी तर पुन्हा पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ आली होती़घरांची झाली पडझडकुठे अधिक तर कुठे कमी पाऊस असलातरी पावसाची संततधार सुरु असल्यामुळे कच्या व मातीच्या घरांची पडझड झाली़ यामुळे सर्वसामान्य नागरीकांचा संसार उघड्यावर आलेला आहे़ सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे़ नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबियांकडून होत आहे़वीज पडल्याने मृत्युमुखीपाऊस दमदार होत असल्यामुळे सोबतच वीज कोसळण्याचे प्रमाण सध्याच्या काळात वाढत आहे़ धुळे तालुक्यातील पुरमेपाडा गावाच्या शिवारात असलेल्या बोरी नदीच्या जवळ कौशल्या कैलास सोनवणे, छाया देवा सोनवणे, सविता खंडू सोनवणे हे नेहमीप्रमाणे बोरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या़ अचानक वातावरणात गारवा निर्माण झाला, पाऊस येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आणि तिघींच्या अंगावर वीज कोसळली़ यात गंभीर दुखापत झाल्याने त्या बेशुध्दच पडल्या़ वैद्यकीय उपचार सुरु असताना कौशल्या सोनवणे आणि छाया सोनवणे या दोघींचा मृत्यू झाला़ तर जखमी सविता सोनवणे हिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहे़शेतकरी वाहून गेलाधुळे तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी शरद नथू पाटील (४१) रा.धामणगाव हे खोरदड रस्त्याने शेतातून घरी येत असतांना बोरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तोल जाऊन पाण्यात पडले आणि वाहून गेल्याची दुदैर्वी घटना घडली.दरम्यान, शेतीसह घरांची पडझड होत असल्यामुळे पंचनामा तातडीने करण्याची मागणी होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे