निवेदनात म्हटले आहे की, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार ,2 फेब्रुवारी पासून डॉ. वैशाली झनकर यांच्या कडे देण्यात आला आहे. मुळात नाशिक जिल्हा तुलनात्मक दृष्टीने धुळे जिल्हा पेक्षा तीनपट मोठा आहे . त्यांना आपल्या जिल्ह्यासाठी वेळ देणे शक्य नाही . नाशिक ते धुळे कमीतकमी 3 तास प्रवास आहे असे असताना ,कार्यभार देणे हेच मुळात संयुक्तिक नाही. जिल्ह्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. डॉ. झनकार यांचा कार्यभार त्वरित काढून पूर्ण वेळ नवीन शिक्षणाधिकारी नियुक्त होईल तोपर्यंत प्रभारी कार्यभार जिल्ह्यातील अन्य अधिकारी यांच्याकडे त्वरित़ देण्यात यावा. निवेदन देताना समन्वयक संजय पवार, डी. जे. मराठे, जे. बी. सोनवणे, देवानंद ठाकूर, आनंद पवार,हर्षल पवार, युसूफ अन्सारी, आमीन कुरेशी, विकास सोनवणे आदी उपस्थित होते.
माध्यमिकचा प्रभारी अधिकाऱ्याकडे पदभार द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:36 IST