शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धुळ्यात भरगच्च कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 17:07 IST

शहरातील मंडळे सज्ज : मिरवणुका वेधणार लक्ष; विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी

ठळक मुद्देशहरातील विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानावर ठेवलेल्या टी-शर्टवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र आहे.तसेच मिरवणुकांमध्ये सहभागी होणारे तरुण मंडळीही त्यांच्या मंडळाचे नाव व छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र टी-शर्टवर तयार करून घेताना दिसत आहे.बाजारात उपलब्ध असलेल्या टी-शर्ट खरेदीसाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे.

(लोकमत न्यूज नेटवर्क) 

धुळे :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील विविध मंडळांतर्फे मिरवणुका व भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंतीच्यानिमित्ताने शहरातील बाजारपेठेत भगवे ध्वज, गळ्यातील मोत्यांचा माळा, टी-शर्ट आदी साहित्य विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवले आहेत.  ते  खरेदीसाठी शनिवारी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी, १९ रोजी आहे. यानिमित्ताने मराठा सेवा संघ, सकल मराठा समाज, शहरातील विविध व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यात प्रतिमापूजन, स्वच्छता अभियान व व्याख्यानाचा कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच मिरवणुकांद्वारे जनजागृतीपर संदेश दिला जाणार आहे. शहरातील प्रमुख मंडळांतर्फे जुना आग्रारोडवरून सोमवारी  सायंकाळी मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे. चाळीसगावरोडवर पुतळ्याचे सुशोभिकरण गेल्या आठवड्यात चाळीसगावरोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याचे काम सुरू झाले होते. हे काम आता पूर्णत्त्वास आले आहे. तसेच शहरातील शिवतीर्थ परिसरातही स्वच्छता करण्यात आली आहे. याठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे शिवतीर्थ परिसर खुलून दिसत आहे. धुळे शहर भगवामय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील जुना आग्रारोड व देवपूर परिसरातील  मुख्य चौकांमध्ये लहान व मोठ्या आकाराचे भगवे ध्वज, तसेच  फलक लावण्यात आले आहेत. अवघ्या एका आठवड्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आल्याने विक्रेत्यांनी फुलवाला चौक, दसेरा मैदान, मालेगावरोड, दत्त मंदिर परिसर, नेहरू चौक व नगावबारी परिसरात भगवे ध्वज विक्रीसाठी विक्रेत्यांनी ठेवले आहे. या भगव्या ध्वजाची किंमत  १०० ते ८०० रुपयांपर्यंत आहे, अशी माहिती विक्रेते नीलेश यादव यांनी दिली.