निजामपुर - जैताने येथे धुळे जिल्हा तेली समाज आयोजित आरक्षण पे चर्चा
जैताणे : ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित केले असून, ते पूर्ववत करण्यासाठी ओबीसी, अनुसूचित जातींना आपली भूमिका सातत्याने शासन दरबारी व न्यायालयात मांडावी लागणार आहे. यासाठी ओबीसींनी सतर्क राहाणे, ही काळाची गरज आहे, असे मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे धुळे जिल्हा अध्यक्ष राजेश बागुल यांनी निजामपूर - जैताने येथे धुळे जिल्हा तेली समाज आयोजित आरक्षण पे चर्चा या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपाचे माजी महापौर भगवान करनकाळ होते.
मंडल आयोग लागू झाल्यावर ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या माध्यमातून आग्रह धरला व ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली. यासाठी इम्पिरिकल डाटा आवश्यक आहे. मंत्री छगन भुजबळ हे शासनाच्या वतीने पाठपुरावा करत आहेत, अशी माहिती तेली समाज जिल्हाध्यक्ष भगवान करनकाळ यांनी दिली.
यावेळी गोविंद चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. तेली पंच एकनाथ चौधरी, तेली समाज युवक मंडळाचे उपाध्यक्ष राकेश चौधरी, मुन्नाभाई पठाण, निजामपूर जैताने तेली समाज अध्यक्ष महेंद्र चौधरी, अशोक झेरवाल, साक्री तालुका समता परिषद अध्यक्ष सतीश बाविस्कर, गणेश देवरे, प्रा. रवींद्र सूर्यवंशी, प्राचार्य मनोज भागवत, रवींद्र जाधव, साक्री तालुका नाभिक समाज अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, मनसे तालुकाध्यक्ष योगेश सोनवणे, अण्णा सोनवणे, गोकुळ भदाणे, किशोर बागुल, कांतिलाल माळी, गोविंद चौधरी, किरण चौधरी, जिभाऊ चौधरी, भालचंद्र चौधरी, नामदेव चौधरी, वसंत चौधरी, पप्पू चौधरी, बापू दसपुते, जयेश गुरव, प्रशांत चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. रवींद्र सूर्यवंशी यांनी मानले.
270821\img-20210826-wa0008.jpg
ओबीसी आरक्षण पे चर्चा बैठकीत मार्गदर्शन करताना भगवान करनकाळ