शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी समाजाने आर्थिकदृष्ट्या जागृत होणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 17:36 IST

धुळयात राज्यस्तरीय परिषद, ओबीसींच्या जनगणनेची मागणी

ठळक मुद्दे- ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी- राज्यकर्त्यांकडून सरकारी तिजोरीच्या लूटीचा आरोप- ओबीसींनी जागृत होणे गरजेचे असल्याचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : एकिकडे ओबीसींमधील कष्टकरी वर्ग राज्याची सरकारी तिजोरी  भरत असतांना दुसरीकडे राज्यकर्ते मात्र लूट करीत आहेत़ त्यामुळे ओबीसींनी आर्थिकदृष्ट्या जागृत होणे गरजेचे आहे, असे मत ओबीसी जातनिहाय जनगणना परिषद, नवी दिल्लीचे निमंत्रक प्रा़ श्रावण देवरे यांनी व्यक्त केले़           शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात रविवारी राज्यातील पहिली राज्यस्तरीय ओबीसी जनगणना परिषद झाली़ त्यावेळी ते बोलत होते़ या परिषदेला महापौर कल्पना महाले, माजी आमदार सदाशिव माळी, डॉ़ माधुरी बाफना, दलित नेते एम़जी़धिवरे, नगरसेवक चंद्रकांत सोनार, भाजपचे संजय शर्मा, सुनिल नेरकर, शिवसेनेचे सतिश महाले, माजी महापौर भगवान करनकाळ, विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे, ज्ञानेश्वर गोरे, डॉ़ नागोराव पांचाळ, डॉ़हिरामण मोरे, रामदास फुलपगारे, रमेश श्रीखंडे, कृष्णा फुलपगारे, सचिन राजूरकर आदी मान्यवर उपस्थित होते़ परिषदेच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले़ त्यानंतर मार्गदर्शन करतांना महापौर कल्पना महाले म्हणाल्या की, ओबीसींमध्ये ३५० जातींचा समावेश होतो़ ओबीसींची सुयोग्य व जनगणना व्हायला हवी, जेणेकरून त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागणार नाही़ त्यानंतर मार्गदर्शन करतांना प्रमुख वक्ते व ओबीसी जातनिहाय जनगणना परिषदेचे निमंत्रक प्रा़श्रावण देवरे बोलत होते़ ते म्हणाले की, देशात ओबीसींची लोकसंख्या सद्यस्थितीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे़ त्यामुळे ओबीसींची जनगणना झाल्यास सरकारी तिजोरीतील ५० टक्के खर्च ओबीसींवर करावा लागेल़