शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा येणाºया धुळे जिल्हा परिषदेतील ३५ कर्मचाºयांना बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:28 IST

उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन.आभाळे यांनी दिल्या आठ विभागांना भेटी

ठळक मुद्देउपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिली आठ विभागांना भेटकाही विभागात कर्मचारी वेळेत आलेच नव्हतेगैरहजर कर्मचाºयांकडून मागितला खुलासा

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे यांनी आज सर्वच विभागांना अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान आठ विभागातील ३५ कर्मचारी वेळेत कार्यालयात आलेच नव्हते. या सर्व कर्मचाºयांना नोटीस बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. अधिकाºयांच्या या ‘सरप्राईज व्हीजीट’मुळे कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे.जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेची ओळख आहे. कार्यालयाची वेळ सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंतची असतांना अनेक विभागातील कर्मचारी वेळेवर येत नाही. काहीजण दौºयाच्या निमित्ताने परस्पर दांडी मारीत असातत. याचा परिणाम कामकाजावर होत असतो. त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे यांनी आज कार्यालयात आल्याबरोबरच प्रत्येक विभागाला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली. त्याची सुरूवात सामान्य प्रशासन विभागापासून केली.  त्यांच्या कार्यालयातच तब्बल ११ कर्मचारी जागेवर आढळून आले नाहीत. यानंतर त्यांनी ग्रामपंचायत, लघुसिंचन, बांधकाम यासह आठ विभागांना भेटी दिल्या. या सर्व विभागात कर्मचारी उशिरा येत असल्याचे निदर्शनास आले. यात सभापतींची पीएंचाही समावेश आहे. उशिरा आलेल्या तसेच गैरहजर आढळून आलेल्यांमध्ये  सामान्य प्रशासनमधील ११, ग्रामपंचायत विभाग-७, बांधकाम विभाग-५, समाज कल्याण -५, लघुसिंचन-३, अर्थ विभाग २, पशुसंवर्धन व आरोग्य विभागात प्रत्येकी एक-एक कर्मचाºयाचा समावेश आहे.  या सर्वांना नोटीस देवून त्यांच्याकडून सात दिवसाच्या आत खुलासा मागविला आहे.  यात कर्मचाºयांच्या त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.  त्या-त्या विभागाच्या प्रमुखांमार्फतच हा खुलाचा प्राप्त होणार आहे. ज्या कर्मचाºयांचा खुलासा समाधानकारक वाटला नाही, त्या कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येईल, असेही आभाळे यांनी सांगितले. दरम्यान  या अचानक भेटीमुळे लेटलतीफ कर्मचाºयांचे धाबे दणाणले असून, मंगळवारी या भेटीचीच जि.प. मध्ये चर्चा सुरू होती. मात्र  अशी ‘सरप्राईज व्हिजीट’ सातत्याने देण्यात यावी अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे