शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अशैक्षणिक कामे थांबविण्यात यावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 22:57 IST

शिक्षक संघटना : जिल्हा परिषदेकडे मागणी

धुळे : जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे काम सोपवण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढला आहे. परिणामी त्यांचे अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाकडून अशैक्षणिक कामे बंद करावी विविध मागण्यांसाठी शिक्षक समितीतर्फे धरणे आंदोलन झाले.शैक्षणिक सत्राचे शेवटचे तीन-चार महिने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. या कालावधीत नवोदय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा होते. तसेच स्नेहसंमेलन, केंद्रस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन होते. याशिवाय रिड टू मी, टॅग, एमआयओसी, चेस प्रशिक्षण, इंग्रजी समृद्धी अध्ययन साहित्य प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीविषयी महिला शिक्षकांचे प्रशिक्षण, तंबाखूमुक्त शाळा अभियान, कर्करोग जाणीव-जागृती मोहीम, केंद्रस्तरीय शिक्षण परिषद, विभागीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता विकास कार्यक्रम, अध्ययनस्तर निश्चिती तपासणी कार्यक्रम, माहिती अधिकार कायदा प्रशिक्षण आदी कामांचा शिक्षकांवर भार आहे. त्यातून शिक्षकांचे अध्यापनाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शासनाने शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे कमी करावीत, अशी मागणी निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या आंदोलनात समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, बापू पारधी, मनोज निकम, जितेंद्र राजपूत, आनंद पाटील, रमेश पाटील, गोकूळ पाटील, अनिल नहिरे, दंगल शिंदे, प्रभाकर रायते, सुभाष पगारे, गोकूळ सोनार, अनिल सोनवणे, रामचंद्र वाघ, महेंद्र पाटील, कैलास ईशी, रामचंद्र भलकारे, मोतीलाल गोवेल, प्रमोद सोनवणे, सुरेश माळी, सुनील सोंजे, मुरलीधर रोकडे, अरुण खैरनार, चंपालाल पाटील, मधुकर पाटील, आनंदा हालोरे, गोपाल लोहार, संदीप पाटील, विजय बोरसे, रमेश कोळी, श्रीकृष्ण सावळे, मुकेश कोळी, गोरख शिंदे, विजय भोई, काशिनाथ वाडिले, चंचल नागरे, प्रदीप पाटील आदींसह सहभागी झाले होते.

टॅग्स :Dhuleधुळे