शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा नवीन इमारतीत ‘फायर सिस्टीम’ बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:43 IST

शासनाकडे निधीची मागणी : अग्निशमन वाहनासाठी जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनपाची निवडणूक पार पडताच नवीन प्रशासकीय इमारतीत ‘फायर सिस्टीम’ बसविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहे़ तर नवीन अग्निशमन वाहन खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना सादर होणार आहे़ ३३ लाख रूपयांचा प्रस्तावमहापालिकेच्या नवीन इमारतीत आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार हायड्रन्ट सिस्टीम, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म, फायर एक्स्टींग्युशर बसविण्यासाठी ३३ लाख ५७ हजार १८ रूपये खर्च येणार आहे़ त्यासाठी स्थायी समितीची मान्यता घेतली जाणार आहे़ तत्पूर्वी महापालिकेने राज्याच्या अग्निशमन सल्लागारांना प्रस्ताव पाठविला असून तो तातडीने मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे़वाहन खरेदीसाठी निधी मागणीशहर हद्दवाढीमुळे अग्निशमन विभागावरील भार वाढला असल्याने अग्निशमन विभागाला बचावाचे कार्य करण्यासाठी एक नवीन अग्निशमन वाहन खरेदी करणे आवश्यक आहे़ केंद्र शासनाच्या ई-मार्केटप्लेस या वेब पोर्टलच्या माध्यमातून खरेदी धोरणासाठी तरतुदींचा अवलंब करून खरेदी करणे बंधनकारक आहे़ अग्निशमन वाहन खरेदीसाठी २ कोटी ५ लाख रूपये खर्च येणार आहे़ पण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत महापालिकेसाठी १ कोटी २ लाख रूपये तरतुद करण्यात आली आहे़ त्यामुळे अग्निशमन सेवांचे बळकटीकरण करणे या योजनेंतर्गत प्रस्ताव आर्थिक, प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकाºयांना सादर केला जाणार आहे़ ६३ शाळांना नोटीसाशहरातील विविध हॉस्पिटल्स, शाळा, सरकारी व खासगी कार्यालये, महाविद्यालये, हॉटेल्स यांना दरवर्षी इमारतीचे फायर आॅडीट करवून घेणे बंधनकारक आहे़ इमारतीचे फायर आॅडीट करवून घेऊन त्यात आवश्यक ती अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक असते़ परंतु फायर आॅडिट न केल्याने अग्निशमन विभागाने ६३ शाळांना नोटीसा बजाविल्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे