भुसावळ : धुळे येथील माहेरवाशीण वकील नवविवाहितेचे नऊ लाखांचे दागिने चोरट्यांनी भुसावळ-साक्री बसमधून मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लांबवले़ या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करून तो भुसावळ बाजारपेठ पोलिसात वर्ग करण्यात आला़अॅड़सपना मयूर जैस्वाल (लाल इमली चौक, नागपूर) या आपल्या भावासोबत नागपूर येथून रेल्वेने भुसावळ येथे उतरल्या़ मंगळवारी पहाटे त्या भुसावळ-साक्री बसने धुळ्याकडे निघाल्या़ बसमध्ये चढताना त्यांच्या बॅगेचे चोरट्यांनी कुलूप तोडले़ त्यातून चार हजारांच्या रोकडसह सोन्याची पोत, बांगड्या, कानातले असे एकूण ५० तोळे सोन्याचे दागिने लांबवण्यात आले़ जळगाव आल्यानंतर विवाहितेला बॅगेतून चोरी झाल्याचे लक्षात आले़ त्यांनी धुळे येथे उतरल्यानंतर धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल केला़ एकूण आठ लाख ७० हजारांचा ऐवज चोरीस गेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ नंतर हा गुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलिसात वर्ग करण्यात आला़ रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते़
धुळ्याच्या नवविवाहितेचे नऊ लाखांचे दागिने लंपास
By admin | Updated: March 7, 2017 23:21 IST