शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुसया दिवशी ८ उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 22:30 IST

शिंदखेडा : रहिमपुरे येथील लाभार्थ्यांचे घरकुलासाठी पंचायत समिती आवारात आंदोलन

शिंदखेडा : तालुक्यातील रहिमपुरे येथील २८ लाभार्थ्यांनी मंजूर घरकुलासाठी जागा मिळावी, या मागणीसाठी मंगळवारपासून पंचायत समितीच्या आवारात सरपंच व कुटुंबियांसह उपोषण सुरु केले आहे. बुधवारी दुपारी या उपोषणकर्त्यांपैकी ८ जण थंडी, ताप व चक्कर उलटीच्या त्रासाने हैराण झाले. वास्तविक हा विषय तहसील कार्यालयाच्या अखत्यारीतला असूनही कुणी अधिकारी उपोषणस्थळी फिरकले नसल्याची खंत लाभार्थ्यांनी व्यक्त केली.सरपंच दिनेश बेडसे व घरकुल लाभार्र्थींसह त्यांचे कुटुंबिय असे ४० महिला व पुरुष पंचायत समिती आवारात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. बुधवारी दुपारी आक्काबाई प्रकाश रामराजे या महिलेला थंडी, ताप होता. अंगावर दोन गोधडी टाकूनही सदर महिला थंडीने अक्षरश: व्याकुळ झाली. त्यांना  दवाखान्यात नेण्यासाठी १०८ क्रमांकावर फोन केला. मात्र, रुग्णवाहिकाही लवकर आली नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी सायंकाळी ५.२५  वाजता सरपंच दिनेश बिºहाडेंच्या मदतीने त्यांना तहसील कार्यालयाच्या वाहनात बसविले. त्यानंतर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका आली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्याने व रक्तदाब वाढलेला असल्याने त्यांना तातडीने धुळे येथे हलविण्यात आले. दरम्यान, उपोषणकर्ते प्रमिलाबाई संजय बैसाणे, राजेंद्र झुलाल रामराजे, लालदास ओंकार जाधव, महेंद्र बाबुलाल रामराजे, भाऊराव मंगा निकुंभे, विनोद बाबुराव रामराजे, झुलाल महारु रामराजे व ७ ते ८ लहान मुले- मुली यांनाही थंडी, ताप, उलटी, चक्कर येणे, असे त्रास जाणवू लागले. उपोषणकर्त्यांसाठी रात्री पंचायत समितीकडून गाद्या व लाईटची सोय करण्यात आली होती. मात्र, डास, मच्छरांमुळे अनेकांच्या अंगावर सुज आली आहे. दरम्यान, दिवसभरापासून सर्व उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असल्याने तहसील कार्यालयाला याबाबत माहिती दिली. मात्र, कोणीच आले नाही. तसेच डॉक्टरांनाही सूचित केले नसल्याने मलाच उपोषणकर्त्यांना दवाखान्यात घेऊन जावे लागत असल्याचे सरपंच बिºहाड़े यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे