शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिका उभारणार १ कोटी रूपयांचे नवीन संकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 17:12 IST

स्थायी समितीच्या सभेत मंजूरी, २४ गाळेधारकांचे होणार पुनर्वसन

ठळक मुद्दे- नवीन इमारतीलगत उभारणार भव्य संकुल- १ कोटी २८ लाखांच्या खर्चास स्थायी समितीची मंजूरी- २४ गाळेधारकांचे होणार पुनर्वसन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम शाळा क्रमांक एकच्या जागेत सुरू आहे़ या इमारतीच्या शेजारी असलेल्या गुजराथी शाळेच्या जागेत १ कोटी २८ लाख रूपयांच्या खर्चातून नवीन संकुल उभारले जाणार आहे़महानगरपालिकेच्या नवीन इमारतीचे काम शाळा क्रमांक एकच्या जागेत जवळपास पूर्णत्वास आले आहे़ मात्र या इमारतीसमोर मनपा संकुलातील २४ गाळे अस्तित्वात असून त्यांच्या कराराची मुदत २०२२ पर्यंत आहे़ परंतु नवीन इमारतीला संरक्षण भिंत व प्रवेशव्दारे उभारण्यासाठी संबंधित गाळे जमिनदोस्त केले जाणार आहे़ त्यामुळे संबंधित गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशाकीस इमारतीलगत असलेल्या मनपाच्या गुजराथी शाळेच्या जागेत नवीन संकुल उभारले जाणार आहे़ गुजराथी शाळा सद्यस्थितीत मोडकळीस आली असून त्याठिकाणी एकही विद्यार्थी नाही़ त्यामुळे शाळेच्या जागेत नवीन सि़स़नं़ ३४७८ येथे नवीन संकुल उभारले जाणार आहे़ त्यासाठी बुधवारी स्थायी समितीच्या सभेत १ कोटी २८ लाख ३६ हजार ४६३ रूपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली़ महापालिका निधीतून संबंधित खर्च केला जाणार असून त्यासाठी गाळेधारकांचे देखील आर्थिक सहकार्य घेतले जाणार असल्याची माहिती अभियंता कैलास शिंदे यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली़