शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी मुख्य वैद्यकीय अधीक्षकांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 12:46 IST

चार वैद्यकीय अधिका:यांवर मदार; उपकरणे धुळखात

ठळक मुद्दे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय 46 पैकी 16 पदांची कमतरता

ऑनलाईन लोकमत

दोंडाईचा, जि. धुळे, दि. 21 - येथे सर्वसामान्य रुग्णांसाठी उभारलेल्या  दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी  मुख्य वैद्यकीय अधीक्षकांच्या नेमणुकीबाबत  नाशिक आरोग्य उपसंचालक उदासीन असतानाच वषानुवर्षे चार वैद्यकीय अधिका:यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडत असल्याचे दिसते. दोंडाईचात      साधारणत:   पंधरा वर्षापूर्वी  जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. या रुग्णालयात विविध  46 पदे मंजूर आहेत. या  उपजिल्हा रुग्णालयात एक मुख्य वैद्यकीय अधीक्षक  व इतर सात वैद्यकीय अधिकारी यांची मंजुरी आहे. परंतु रुग्णांवर उपचार करणारे  वैद्यकीय अधिकारी यांची वषानुवर्षे कमतरता आहे. सद्यपरिस्थितीत  मुख्य वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिका:यांची कमतरता आहे. 46 पैकी 16 पदांची कमतरता आहे.डॉ.एल.बी. चंद्रे यांच्याकडे तात्पुरता  वैद्यकीय अधीक्षकाचा कार्यभार दिला आहे. तर डॉ.एस.एस. पारख, डॉ.ए.डी. भामरे, डॉ.जे.आर. ठाकूर, डॉ.नेहा पारख आदींवर रुग्णालयाची मदार आहे. तात्पुरती नेमणूक असल्याने कर्मचारी वर्गावर  पाहिजे तसा अंकुश नाही.वैद्यकीय अधिका:याची कमतरता असतानाच एक कनिष्ठ लिपिक, अधिपारीचारीका  अन्य ठिकाणी प्रतिनियुक्तीवर आहेत.  अस्थीतज्ञ, हृदयरोग, बालरोग, दंत रोगतज्ञ नाहीत. सहाययक अधिसेविका, परिचारिका, अधिपरीचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, शिपाई, कक्ष सेवक, शस्रक्रिया कर्मचारी व सफाई कामगार  यांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. त्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजलेत. भूलतज्ज्ञ नसल्याने कोणतीही शस्रक्रिया होत नाही. त्यामुळे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा  कोणताही फायदा गरिबांना होत नाही. त्यामुळे पदरमोड करून रुग्णांना धुळे येथे जावे लागते. अपू:या वैद्यकीय अधिका:यांमूळे रुग्णावर पुरेसे उपचार होत नाहीत. रुग्णालयात अत्यंत महागडी  वैद्यकीय उपकरणे आहेत. ती हाताळण्यास पुरेसे वैद्यकीय अधिकारी नसल्याने ती उपकरणे नादुरुस्त किंवा वापरा अभावी  बंद खोलीत धूळ खात पडली आहेत. सिव्हील सर्जन व नाशिकच्या  आरोग्य उपसंचालकडे उपजिल्हा रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी करूनही  अद्यापही पुरेसे  वैद्यकीय  अधिकारी  यांची नेमणुक झाली नाही. त्यामुळे रुग्णात नाराजी  जानवते. कायमस्वरूपी महिला वैद्यकीय अधिकारी  नसल्याने महिलांचा  आरोग्य विषयक समस्या सोडण्यास अडचण येते.  स्त्री रोगतज्ञ  नसल्याने   येथे तपासणी होत नाही.  त्यामुळे पीडितास  धुळे येथे पाठवावे लागते.  महिला व पुरुष शस्त्रक्रियाही जेमतेम होतात.हृदय रोगतज्ञ, अस्थीतज्ञ नसल्याने अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचार करणेसाठी धुळे येथे पाठवावे लागते .त्यामुळे अनेकदा रुग्ण मरण पावल्याचे दिसते .जीवावर बेतते. सफाई कामगारांची  वानवा असल्याने अस्वच्छता दिसते. रुग्णालयात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी आहे.रुग्णालयात पिण्याचा पाण्याची व पुरेशा  औषधाची सोय आहे. उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी  यांची नेमणूक करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

दवाखान्यात फक्त दोन तास रुग्ण तपासले जातात. दवाखाना स्वच्छ असावा. सर्व वैद्यकीय अधीकारी नेमून सर्व ऑपरेशन व्हावेत. काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सयाजीराव दिसतात. ते नियमित यावेत.- सुनीता परदेशी,  रुग्ण

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कायम स्वरूपी वैद्यकीय अधीक्षकांची व इतर वैद्यकीय अधिकारी  नेमणूक करण्यासाठी  वरिष्ठां कडून प्रय} होत आहेत.- ललित चंद्रे, मुख्य वैद्यकीय अधीक्षकदोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय