शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विविध योजनेत सुसुत्रता आणण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 22:09 IST

कृषी राज्यमंत्र्यांना निवेदन : अनुषंगिक केली सविस्तर चर्चा

धुळे : शेतकऱ्यांचे शेती विषयक अडचणी, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अडचणी, शासनाच्या विविध योजनेत सुधारणा करून योजनेत सुसुत्रता आणण्यासाठी पढावद (धुळे) येथिल कृषी भूषण अ‍ॅड़ प्रकाश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे आणि शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने कृषी राज्यमंत्री दादा भूसे यांची भेट घेतली़ त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना निवेदन सादर केले़शिवसेना जिल्हा संघटक मंगेश पवार, भाईदास पाटील विजय शिसोदे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी किरण पवार, बाळु धारकर, कारभारी मनगटे, अशोक पाटील, राहुल पाटील, मनोज पाटील व इतर ही शेतकरी उत्पादक कंपनी पदाधिकारी उपस्थित होते. शेतकºयांना कृषी पंपासाठी २४ तास विज उपलब्ध करून दिली तर, शासनावर विशेष आर्थिक भार न पडता, जास्त वीज व भुगर्भातील पाण्याचा उपसा होणार नाही़ सर्वांना फायदा होईल. तसेच हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत बदल करुन जुन्या मानकानुसारच नुकसान भरपाई मंजुर करावी, याबाबत निवेदन दिले. त्यानुसार मंत्री भूसे म्हणाले, हा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला आहे. व त्यानुसार विमा कंपनीला दिलेले टेंडर रद्द करुन नविन प्रक्रीया सुरू केली आहे. नविन मानकात बदल केला जात आहे. विविध योजना स्थानिक गरजेनुसार चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत शेतकºयांना बियाणे अनुदानावर दिले जाते. हे आतापर्यंत महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ व शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत दिले जात होते. मात्र दोन वर्षापुर्वी शासनाने निर्णय घेऊन शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत अनुदान बंद केले. तसेच प्रमाणित बियाणे उत्पादन अनुदान शेतकºयांना दिले जात होते. परंतु कोरोनोच्या पार्श्वभूमीवर हे दिले गेले नाही. ते अनुदान भविष्यात निधी उपलब्ध झाल्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुध्दा देणेबाबत होकार दिला. केंद्र सरकारने महाराष्ट्रात बिजोत्पादन करणाºया ४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रत्येकी ६० लाख मर्यादेपर्यत अनुदान मंजुर करुन निधी राज्य सरकारकडे दिलेले आहेत. परंतु वित्त विभागाच्या लाल फितीच्या कारभारामुळे हा निधी कृषी विभागाला लगेच वित विभाग देत नसल्याने ही कामे पुर्ण होऊ शकली नाहीत. हा निधी वित्त विभागाकडुन लवकर प्राप्त करून कामे पुर्ण करण्याचे आश्र्वासन त्यांनी दिले़

टॅग्स :Dhuleधुळे