शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी, शिवसेनेचा ‘ईव्हीएम’वर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:05 IST

महापालिकेवर मोर्चा : भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह, फेरनिवडणूक घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणूकीत अनेक विद्यमान नगरसेवकांचा पराभव करून नवखे उमेदवार जिंकले असून त्यामुळे मतदारच संभ्रमात पडले आहे़ भाजपने ‘ईव्हीएम’मध्ये गडबड केल्याचा आक्षेप घेत राष्ट्रवादी, शिवसेनेतर्फे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला़ तसेच फेरनिवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली़‘ईव्हीएम’चा जाहीर निषेधप्रभाग ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सागर कांबळे, बानो बी लतीफ खाटीक, मंदाकिनी पाटील व कैलास चौधरी यांनी एकविरा देवी मंदिरापासून महापालिकेवर मोर्चा काढला़ मनपा निवडणूकीत उमेदवार विजयी झाले नसून ईव्हीएम विजयी झाल्याचा जाहीर निषेध अशा मजकुराचे पोस्टर मोर्चाच्या सुरूवातीस महिलांनी झळकवले होते़ या मोर्चात प्रभाग ४ मधील उमेदवारांसह शिवसेनेचे उमेदवार महेश मिस्तरी, राष्ट्रवादीचे उमेदवार रविंद्र आघाव, जितेंद्र शिरसाठ, संदीप पाटोळे, सुरेश बोरसे यांच्यासह विविध प्रभागातील पराभूत उमेदवार सहभागी झाले होते़ फेरनिवडणूकीची मागणीभाजपचे उमेदवार सक्षम नसतांना शिवाय मतदारांनी देखील त्यांना मतदान केलेले नसतांना भाजप विजयी  झालेच कसे? मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे त्यांना ५० जागा कशा मिळाल्या? असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले़ तर मतमोजणीच्या ठिकाणी वायफाय सेवा बंद ठेवण्याची मागणी केलेली असतांना ती सुरू ठेवण्यात आली व ईव्हीएम हॅक करण्यात आल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला़ त्याचप्रमाणे मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचे नेटवर्क जाणीवपूर्वक जाम करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला़ महेश मिस्तरी यांनी, आपल्याला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ५० जागा भाजपने आधीच मॅनेज केल्याचे सांगितले़ शिवाय २५ लाख दिले तर ‘ईव्हीएम हॅक’ करून आपल्याला विजयी करू, असेही त्याने सांगितले असून आपल्याकडे त्याच्या संभाषणाचे  ‘रेकॉर्ड’ असल्याचे सांगितले़  मतमोजणीच्या दिवशी सकाळीच माझ्या प्रभागात चारही जागा भाजपच्या जिंकणार असल्याचे सांगण्यात आले, एकूणच ‘ईव्हीएम मॅनेज’ असल्याशिवाय असे होऊ शकत नाही, असे मिस्तरी यांनी स्पष्ट केले़ सर्व उमेदवारांनी बॅलेट पेपरव्दारे फेर निवडणूक घेण्याची मागणी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली़ याबाबत राज्य निवडणूक आयोगाला कळविले जाईल, असे आयुक्त म्हणाले़ शहरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये ब या जागेवर उमेदवारी करणाºया उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या संख्येत व वैध मतांच्या संख्येत १ हजार मतांची तफावत येत असल्याची तक्रार या प्रभागातील उमेदवार राजश्री किशोर शिंदे यांनी आयुक्तांकडे केली़ वैध मतांमध्ये व उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये १ हजार मतांची तफावत असून निवडणूकीचा निकाल हा पारदर्शक नाही़ तरी याबाबत योग्य तो खुलासा करण्यात यावा, अन्यथा निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे निवेदनात नमुद आहे़ भाजपचा नव्हे ‘ईव्हीएम’चा विजय़़़मनपा निवडणूकीत भाजपचा नव्हे तर ‘ईव्हीएम’चा विजय झाल्याचे शिवसेनेचे महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ जनतेला उमेदवारच माहित नसतांना हजारो मते कशी मिळू शकतात? भाजपने जनतेला केवळ बटन दाबण्याचे पैसे दिले़ कारण कोणतेही बटन दाबले तरी विजय आपलाच होणार, याची खात्री त्यांना होती़ प्रमुख विरोधी पक्ष असल्याने त्यांनी शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न केला़ एमआयएमला बळ देत राष्ट्रवादीला रोखले़  आम्ही व्हीव्हीपॅटच्या मागणीसाठी दाखल  केलेली याचिका अजूनही प्रलंबित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ 

टॅग्स :Dhuleधुळे