शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 19:26 IST

विखरण : राजकारण केल्याचा प्रकल्पबाधित शेतकºयांकडून निषेध

ठळक मुद्देविखरण येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहनतत्पूर्वी या पुतळ्यास काठीने मारण्यात आले होतेयावेळी प्रकल्पबाधिक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विखरण ता.शिंदखेडा येथील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राजकारण करून स्थानिक आमदार तथा राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यावर बेछूट आरोप केल्याच्या निषेधार्थ विखरण गावाला प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी विखरण ग्रामपंचायतीच्या अंगणात पुतळयाला शेण मारून त्याचे दहन केले. दरम्यान, सर्व वृध्द शेतकºयांनी एकत्र येवून नवाब मलिक यांच्या पुतळ्याला हातातील काठीने बडवले. यावेळी प्रकल्प संघर्ष समितीचे शांताराम पाटील, विठ्ठल पाटील, विक्रम तायडे, शंकरसिंग गिरासे, विश्वास पाटील, जगन पाटील, विनायक पाटील, भानुदास पाटील, भिमसिंग गिरासे, राकेश पवार, दिलीप कोळी, जितेंद्र गिरासे, विनोद पाटील, निलेश सावळे, चुनिलाल पाटील, दंगल पाटील, रमेश पाटील, संजय पाटील, सचिन पाटील, नारायण पाटील यांच्यासह विखरण प्रकल्पात जमीन गेलेले प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. प्रकल्प संघर्ष समितीचे शांताराम पाटील यावेळी म्हणाले की, प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकºयांना तत्कालीन जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी ८० हजार रुपये एकरी मोबदला शासकीय दरानुसार जाहीर केला  होता, त्यानंतर संघर्ष समितीसोबत लोकप्रतिनिधी जयकुमार रावल यांनी या दराला तीव्र विरोध केला. परंतु तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी, तुमची या प्रकल्पात जमीन नाही. त्यामुळे तुम्ही बोलू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे आमच्यातील एका सहका-याने त्याच्या हिश्श्याची ५३ आर जमीन त्यांना देण्याचे ठरले म्हणून ती जमीन त्यांनी घेतली आहे. त्यात कोणताही गैरप्रकार नाही. धर्मा पाटील हे आमच्या संघर्षातील एक सहकारी होते. त्यांच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात आला, वास्तविक या सर्व प्रकाराला तत्कालीन सरकारच जबाबदार असल्याचा आरोप  संघर्ष समितीचे शांताराम पाटील यांनी यावेळी केला. दरम्यान, यावेळी विठ्ठल पाटील, विक्रम तायडे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.