शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नावालाच ‘झाडे लावा, झाडे जगवा’

By admin | Updated: January 16, 2017 00:36 IST

मनपा : दहा हजार रोपे लागवडीचा दावा, प्रत्यक्षात पाचशे रोपेही नाही

धुळे : शासनाने जुलै 2016 ला राबविलेल्या दोन कोटी वृक्ष लागवड मोहिमेत पुरेशी रोपे उपलब्ध न झाल्याने मनपा प्रशासनाने गांडूळ खत प्रकल्पाच्या जागेत रोपवाटिका तयार करून 10 हजार रोपांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र मनपाने संवर्धन केलेली रोपे 500 पेक्षाही कमी असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आल़े राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचे धोरण शासनाने जुलै 2016 मध्ये आखले होत़े सदर मोहिमेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते व त्यानुसार धुळे जिल्ह्यात साडेसहा लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते, तर महापालिकेच्या हद्दीत अडीच हजारावर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होत़े वृक्षारोपणाच्या या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्यासाठी मनपाने शहरात 2 हजार 600 खड्डे खोदून तयार ठेवल़े मात्र सामाजिक वनीकरण विभागाकडून मनपाला केवळ 1 हजार 750 रोपे उपलब्ध झाल्याने खोदून ठेवलेले खड्डे नंतर बुजविण्याची नामुष्की मनपा प्रशासनावर उद्भवली होती़  सदरचा प्रकार गांभीर्याने घेत मनपा प्रशासनाने स्वत:चीच रोपवाटिका तयार करण्याचा निर्णय घेतला होता़  शहरातील वरखेडी रोडवरील गांडूळ खत प्रकल्पाच्या जागेवर एका बाजूला रोपवाटिकेसाठी जागा करण्यात आली व विशिष्ट आकाराच्या पिशव्यांमध्ये माती आणि खत टाकून बीजारोपण करण्यात आले होत़े सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात 10 हजार बीजारोपण करण्यात येत असून भविष्यात 1 लाख रोपे वाटिकेत तयार करण्याचा मानस असल्याचे त्यावेळी मनपा प्रशासनाने स्पष्ट केले होत़े स्थायी समिती सभापती सोनल शिंदे व सुमन फाउंडेशनचे अध्यक्ष विजय चांडक यांनी याकामी पुढाकार घेत रोपांसाठी बिया व प्लॅस्टिक पिशव्या उपलब्ध करून दिल्या होत्या़ त्यानुसार मनपाने बीजारोपण केले खऱे; परंतु प्रत्यक्षात 10 हजार नव्हे तर 500 पेक्षा कमी रोपांची लागवड करण्यात आल्याचे दिसून आले आह़े पांझरा जलकेंद्रात या रोपांचे संवर्धन केले जात आह़े अनेक पिशव्यांमध्ये केवळ माती भरून ठेवण्यात आली आह़े त्यामुळे इतक्या कमी रोपांची लागवड का करण्यात आली? उर्वरित बिया व पिशव्यांचे काय झाले हे मनपा प्रशासनाने स्पष्ट करणे आवश्यक आह़े मनपाने केलेला 10 हजार वृक्ष लागवडीचा दावा फोल ठरला आह़ेमनपास रोपवाटिका तयार करून वृक्ष संवर्धन करण्यासाठी मागील वर्षी सहकार्य केले होत़े शिवाय दोन ते तीन हजार बिया दिल्या होत्या़ त्यानंतर सर्व बीज लागवड होणे आवश्यक होत़े              -विजय चांडकअध्यक्ष, सुमन फाउंडेशनमहापालिकेला वृक्ष लागवड करण्यासाठी साडेसात हजार प्लॅस्टिक पिशव्या दिल्या आहेत़ पाच हजार झाडे लावण्यात आली आह़े झाडे लावल्यानंतर पाहणी केलेली नाही़-सोनल शिंदेस्थायी समिती सभापती