शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हस्ती शाळेला राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 12:17 IST

दोंडाईचा । स्व़ शांतीलाल जैन, स्व़ कांतीलाल जैन यांचा उद्दात हेतू

दोंडाईचा : दर्जेदार व गुणवत्तायुक्त इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यात १७ वर्षांपासून सदैव अग्रेसर असणाऱ्या हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, हस्तीच्या पूर्व प्राथमिक शाळेला अर्ली चाईल्ड हूड असोसिएशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील २ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.१२ व १३ फेब्रुवारी दरम्यान अर्ली चाईल्ड हूड असोसिएशनची अर्ली एज्यु एशिया वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद सिटी पँलेस, जयपूर- राजस्थान येथे ‘आपली मुले-आपले भविष्य’ या विषयावर झाली. आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन जयपूर राजघराण्याच्या राजकुमारी व आमदार दियाकुमारी यांनी केले. परिषदेचे आयोजन ईसीएच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.स्वाती पोपट वत्स, एज्युकेटिव्ह डायरेक्टर डॉ.रीता सोनावात, कोषाध्यक्षा डॉ.कामिनी रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.पूर्व प्राथमिक शिक्षणात गुणवत्तायुक्त शिक्षणाचे महत्त्व, आपल्या संस्कृतीची व संस्कारांची शिक्षणात गुंफण करणे, तसेच याकरिता इटलीचे डॉ. डेनियला, डॉ.स्टीफन कोबेलो, इंग्लडचे डॉ.क्लेअर वाँर्डन, हैद्राबादच्या सोनल अँड्रयुज, डॉ.रॉबर्ट टिझर, मुंबईचे समीर दलवाई, आशा वर्मा, स्नेहा तापडिया पुणे असे विविध ठिकाणांहून तज्ज्ञ वक्ते आले होते. परिषदेमध्ये हॉल आँफ फेम अँवार्ड शृंखले अंतर्गत हस्ती स्कूलला राष्ट्रीय पातळीवरील अतिशय मानाचे ‘ग्रीन स्कूल अँवार्ड’ जे संपूर्ण भारतातून फक्त चार शाळांना दिले गेले व ‘एशिया टॉप-फिफ्टी नॉन फ्रँचायझी स्कूल अ‍ॅवॉर्ड’ अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सदरचे पुरस्कार डॉ. डेनियला, डॉ. अर्नेस्टो, डॉ.रिता सोनावत यांचे हस्ते हस्ती स्कूलचे चेअरमन कैलास जैन, सौ.शितल जैन, सकीना भारमल, स्मिता साठे, पूनम पाटिल व प्रियंका जैन यांनी स्विकारले. हस्ती बँक उपाध्यक्ष पहलाज माखिजा, जेष्ठ संचालक मदनलाल जैन, शालेय समिती जेष्ठ संचालक यशवंत स्वर्गे, डॉ विजय नामजोशी यांनी कौतुक केले.स्व. शांतीलालजी जैन व स्व. कांतीलालजी जैन यांनी एक उद्दात हेतूने सुरु शाळा सुरु केल्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे