शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑपुरूषांच्या त्यागाचे चिंतन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 11:59 IST

जयहिंद हायस्कुलमध्ये झालेल्या व्याख्यानात प्रा.डॉ. प्रविणसिंग गिरासे यांचे प्रतिपादन

आॅनलाइन लोकमतधुळे :वर्तमान परिस्थितीत युवकांम्ध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षणाबरोबर मुल्यसंस्कार करण्यासाठी महापुरुषांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रासाठी दिलेल्या समर्पण व त्यागाचे चिंतन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद केंद्र धुळे संचालक तथा झेड.बी.पाटील महाविद्यालय धुळे येथील प्रा. डॉ.प्रवीणसिंग गिरासे यांनी आज येथे केले.जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद संयुक्त जयंती निमित्त आयोजित समारंभात डॉ.गिरासे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सरला पाटील होत्या. पर्यवेक्षक संजय देवरे, स्वामी विवेकानंद केंद्र धुळे शहर प्रमुख किशोर बोरसे उपस्थित होते.प्रा.गिरासे पुढे म्हणाले शहाजीराजे व जिजाऊ यांनी एकत्र पाहिलेल्या स्वराज निर्मितीच्या स्वप्नपूर्तीसाठी जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत परकीय तसेच स्वकीयांशी संघर्ष करत भारतीय समाजात आत्मविश्वास निर्माण केला. शिवरायांचा राज्याभिषेक करुन स्रियांचा सन्मान असलेले न्याय व कायद्याचे स्वराज्य निर्माण केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी प्रस्थापितांच्या विरोधास न जुमानता सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. स्वामी विवेकानंद यांनी पारतंत्र्यात असलेल्या भारतीय समाजात आपल्या क्रांतिकारी व मानवतावादी विचारांनी स्वाभिमान जागृत करत भारतीय स्वातंत्र्य चळवळ प्रखर केली. सूत्रसंचालन मनिषा बच्छाव तर आभार हेमलता ठाकरे यांनी मानले.

टॅग्स :Dhuleधुळे