शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

डाव्यांच्या किसान मोर्चात नरेंद्र पाटील झाले सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 17:05 IST

प्रतिक्रिया : शासनाने लक्ष दिले नाहीतर शेतकरी नक्षलवादी मार्ग स्विकारतील

ठळक मुद्देडाव्यांनी नाशिक येथून काढला मोर्चामोर्चात नरेंद्र पाटील सहभागी झालेप्रकृती बिघड्याने रविवारी विखरणला परतले

आॅनलाईन लोकमत

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील प्रस्तावितऔष्णिक प्रकल्पात जाणाºया शेती जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील  यांचा मुलगा नरेंद्र पाटील डाव्या पक्षांच्या किसान लाँग मोर्चामध्ये  सहभागी झाले. मात्र प्रकृती बिघडल्याने रविवारी विखरणला परतले. शासनाने शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी नक्षलवादी मार्ग स्विकारण्याची भिती नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.शेतकºयांच्या विविध मागण्यासंदर्भात नाशिक येथून निघालेल्या डाव्या पक्षांच्या लाँग मोर्चामध्ये शनिवारी रात्री विखरणचे नरेंद्र पाटील हे मुंबईत जाऊन मोर्च्यात सहभागी झाले. मार्चसोबत पाच ते सहा किलोमीटर चालल्यानंतर प्रकृती खराब झाल्याने ते विखरणला परतले. प्रकृती खराब झाल्याने आपण रविवारी विखरण  या गावी परतल्याचे  नरेंद्र पाटील यांनी सांगितले.सामूहीक आत्महत्येचा इशाराशासनाने आपल्या मागणीकडे लक्ष दिले नाहीतर आपण सामूहीकरित्या आत्महत्या करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने नरेंद्र पाटील यांनी सांगितले.अण्णा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलनात  सहभागी होण्याचे आवाहनदरम्यान, नरेंद्र पाटील यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. यावेळी अण्णा हजारे यांनी यासंदर्भात सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच दिल्लीत आयोजित आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण दिल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.