शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र पाटील बैठकीसाठी अर्ध्या रस्त्यातून पुन्हा मुंबईत परतले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 11:40 IST

विखरण देवाचे : जमिनीचा वाढीव मोबदला प्रकरण; आज मंत्रालयात पुन्हा बैठक

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात ‘महाजनको’ ने ४८ लाख रुपये वर्ग केल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी पुढील भूमिका ३ मार्चला जाहीर करेल, असे म्हटले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचे विखरण देवाचे येथील घर बंद आहे.नरेंद्र पाटील वाढीव मोबदल्यासाठी मुंबईत मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आहे. त्यामुळे आज मंत्रालयात होणाºया बैठकीत काय निर्णय घेतला जातो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे : विखरण देवाचे येथील धर्मा पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा लहान मुलगा नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी मंत्रालयस्तरावर लढा सुरू केला आहे. सोमवारी मंत्रालयात झालेली बैठक फिस्कटल्यानंतर नरेंद्र पाटील व त्यांचे नातेवाईक हे धुळ्यात आज पत्रपरिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार होते. त्यानुसार ते रात्री धुळ्याकडे येण्यासाठी निघाले होते. परंतु, त्यांना पुन्हा चर्चेसाठी आज मंत्रालयात बोलविल्यामुळे ते मुंबईकडे परतल्याची माहिती  नरेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. शिंदखेडा तालुक्यातील मेथी-विखरण देवाचे येथे औष्णीक ऊर्जा प्रकल्पासाठी धर्मा पाटील यांची जमिन संपादीत झाली होती. परंतु, त्यांना त्यांच्या शेतजमिनीला लागून असलेल्या शेतकºयापेक्षा अल्प मोबदला मिळाला होता. त्यासाठी धर्मा पाटील यांचा संघर्ष सुरू होता. परंतु, त्यांना यश मिळत नसल्याने त्यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात आत्महत्या केली होती. २८ जानेवारीला त्यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या आत्महत्येनंतर शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने धर्मा पाटील यांची संपादीत केलेल्या जमिनीचे फेरमूल्यांकन करण्यात आले होते. त्याचा अहवाल सादरही करण्यात आला होता. त्यानुसार गेल्या आठवड्यात ‘महाजनको’ ने ४८ लाखाचे सानुग्रह अनुदान त्यांना दिले होते. परंतु, नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या शेत जमिनीला लागून असलेल्या जमिनीला जो १ कोटी ८९ लाख रुपयांचा मोबदला मिळाला; तोच मोबदला आम्हांलाही मिळायला हवा; अशी मागणी केली आहे. 

सोमवारी बैठक फिस्कटली वाढीव मोबदल्यासाठी सोमवारी मंत्रालयात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ‘महाजनको’ चे अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला नरेंद्र पाटील, त्यांचे नातेवाईक रोहन सोनवणे उपस्थित होते. परंतु, ही बैठक फिस्कटली. शासन ४८ लाख रुपयांवर ठाम असल्याचे रोहन सोनवणे यांनी सांगितले होते. त्यामुळे मंगळवारी नरेंद्र पाटील हे धुळ्यात पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडणार असून जमिन संपादीत करणारे अधिकारी व सरकारविरूद्ध पोलिसात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार नरेंद्र पाटील व त्यांचे नातेवाईक हे धुळ्याकडे निघाले होते. परंतु, त्यांना अर्ध्या रस्त्यातून फोन आल्यामुळे ते पुन्हा मुंबईकडे रवाना झाले आहेत.