शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नराधम रेवनाथ भीलच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 14:36 IST

पोलीस अधीक्षकांची माहिती : दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरण

ठळक मुद्देदोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरणसंशयित रेवनाथ रामसिंग भगत (भील) याच्या मुसक्या आवळल्यापोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दोंडाईचा येथील पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा नराधम रेवनाथ रामसिंग भगत (भील) (३५) रा़ म्हाळसानगर, दोंडाईचा याच्या मुसक्या विशेष तपास पथकाने रविवारी सकाळी आवळल्या़ तो या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली़ पाच वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून एका शाळेमागील निर्जन घराच्या अंगणात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी दोंडाईचा येथे घडली होती़ याप्रकरणी स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला होता़ त्यानंतर विशेष तपास पथकाची रचना करण्यात आली़ या पथकाने विविध माध्यमातून माहितीचे संकलन केले़ संवाद साधत संशयित रेवनाथ रामसिंग भगत (भील) याच्या तब्बल २४ दिवसानंतर मुसक्या आवळल्या़ त्याच्याकडून या प्रकरणातील इत्यंभूत माहिती संकलित केले जाईल़ यात कोण-कोण आहेत याचा छडा लावला जाईल़ कदाचित आरोपींची संख्या वाढू शकते़ त्या दृष्टीने सखोल तपास केला जाईल असा विश्वास पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी व्यक्त केला़पत्रकार परिषदेप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपासाधिकारी संदिप गावित, दोंडाईचा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते़