गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू आहे़ त्यात सुरुवातीच्या काळात रुग्ण संख्या कमी जाणवत असली तरी कालांतराने याच रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले़ रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे त्यावर प्रतिबंध लागावा यासाठी लसीकरणाची मोहीम राबविण्याचे धोरण अवलंबिण्यात आले. टप्प्या टप्प्याने शहरासह जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध होऊ लागली़ वयोगटानुसार त्याचे वितरण होण्यास सुरुवात करण्यात आली़ लसीकरण करण्यास सुरुवात झाल्यानंतर खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये लस देण्यात आली़ नंतरच्या काळात ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली त्यांना प्राधान्य देण्यात आले़ परिणामी लसीकरणासाठी ज्यांची ऑनलाईन नोंदणी झाली त्यांना लस उपलब्ध झाली़ ज्यांची नोंदणी करणे बाकी आहे त्यांना लस उपलब्ध झालेली नाही़ एकंदरीत पाहाता सुमारे २६ टक्के लसीकरणाचे काम मार्गी लागले आहे़
केवळ २६ टक्के
लसीकरण
- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे त्यापासून आपली सुटका व्हावी यासाठी लसीकरण करून घेण्याचे फर्मान शासनाकडून निघाले़ सुरुवातीला सरकारी आणि खासगी अशा दोन्ही ठिकाणी लस उपलब्ध करून देण्यात आल्या़
- लस उपलब्ध होण्याचे प्रमाण सुरुवातीला बऱ्यापैकी असले तरी काही जणांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही़ परिणामी बऱ्याच केंद्रावर लस पडून होती़ कालांतराने त्याचेही नियोजन करून असलेल्या लस देण्यात आल्या़
- ही संख्या वाढत गेली आणि त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने आधारकार्ड घेऊन ऑनलाईन नोंदणी ही वयोगटानुसार बंधनकारक करण्यात आले होते़ त्याचाही परिणाम हा लस घेण्याच्या प्रमाणात दिसून आला होता़
- वयोगटानुसार आधारकार्डच्या माध्यमातून नोंदणी बंधनकारक केल्यामुळे लस घेण्याचे प्रमाण आणि लसीकरण केंद्राच्या ठिकाणी होणारी गर्दीवर त्याचा परिणाम जाणवू लागला़ गर्दी ओसरली आणि नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य मिळाले़
लसीकरण कमी
होण्याचे प्रमाण
कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे सांगण्यात आले़ पण, ज्यांची ऑनलाईन नोंदणी असेल त्यांचा विचार होत असल्याने लसीकरण कमी होऊ लागले आहे़ आजही बऱ्याच जणांकडे मोबाईल नाही़ परिणामी ऑनलाईन नोंदणी नाही़
(कोटसाठी)
कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांसाठी शासनाकडून लस उपलब्ध करून दिली जात आहे़ वयोगटानुसार आणि ऑनलाईन नोंदणीप्रमाणे संबंधितांना लस दिली जात आहे़ लस ज्या प्रमाणात उपलब्ध होत आहे त्या प्रमाणात त्याचे वितरण होत आहे़
अजीज शेख, आयुक्त
सर्वात जास्त लसीकरण झालेली केंद्रे
- मोराणे : २३३०१
- कापडणे : २६,६३३
- सोनगीर : १८,५०३
- प्रभातनगर : ४०,५०९
- यशवंतनगर : ३२,२०६
सर्वात कमी लसीकरण झालेली केंद्रे
- सुभाषनगर : २६,०२०
- नेर : १९,८०४
- दुसाणे : १५,४०८
- मांजरी : ८,००९
- वार्सा : ९,१०८