शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार - शहादा चौफुलीवर सिग्नल बसविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:55 IST

दोंडाईचा : अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक

दोंडाईचा : धुळे-दोंडाईचा-शहादा हा राज्य महामार्ग असून या मार्गावर चोवीस तास वाहतुकीची वर्दळ असते. या मार्गावरील अपघात टाळण्यासाठी, वाहतूक सुरळीत होण्यासाठी नंदुरबार चौफुली व संतोषी माता मंदिर चौफुलीवर सिग्नल बसविण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक व वाहन धारकांनी केली आहे.दोंडाईचा शहर धुळे व नंदुरबारचे मध्यवर्ती स्थान आहे. राज्य क्र. सहावरील महत्त्वपूर्ण गाव आहे. अवजड वाहनांसह सर्वच प्रकारची वाहनांची नेहमीच वर्दळ या रस्तावर असते. दोंडाईचा शहराच्या या बायपास वरून शहादा, नंदुरबारकडे वाहने ये-जा करतात. येथून मध्यप्रदेश व गुजरात राज्यात जाणे सोयीचे आहे. महत्त्वाचे म्हणजे अहमदाबाद व तामिळनाडूचे अंतर या मार्गाने कमी होते. साहजिकच या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. १२ कि.मी. अंतरावर तापी नदी असून या नदीतून दररोज शेकडो ट्रक, ट्राला भरधाव वेगाने याच मार्गावरून जातात. साहजिकच अपघातास नेहमीच आमंत्रण असते. काही वर्षांपूर्वी भरधाव धावणाऱ्या रेतीचा ट्रकने दुचाकी वाहनधारकाला चिरडले होते. या मार्गावर नेहमीच छोटे मोठे अपघात होतात.या अडचणीचा सामना सर्वसामान्य जनतेसह पोलिसांना करावा लागतो. सिग्नल नसल्याने वाहन वेगाने भरधाव जातात. यामुळे वाहनांची कोंडी होते. या मार्गावर वाहनांची संख्या, वहातुकीची कोंडी, अपघात, जीव मुठीत धरून जाणारे पादचारी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली कॉलनी, शाळा, बँक यांचा विचार करता अपघातास आळा घालण्यासाठी नंदुरबारचौफुली, केशरानंद पेट्रोल पंप, संतोषी माता मंदिरजवळ सिग्नलची मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे