ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 19 - पावसाळा अगदी मोजक्याच दिवसांवर आला आह़े अधिका:यांनी आपल्या विभागाच्या जबाबदारीकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत कराव़े, काही विपरीत घटना घडल्यानंतर त्याचे निवारण करण्यात अपयश आल्यास तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल़ अद्याप पावेतो नालेसफाईला प्रारंभ का झाला नाही, लवकरात लवकर नाल्यांची सफाई झाली पाहीजे असे आदेश आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिले आहेत़ आयुक्त संगीता धायगुडे यांनी आपल्या दालनात सकाळी अधिका:यांची आपत्ती निवारणबाबत बैठक घेतली़ त्यावेळी आयुक्तांनी सूचना दिल्या़ विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होत़े पावसाळाच्या पाश्र्वभूमीवर आपत्ती निवारणाबाबत आयुक्तांनी बैठक घेवून अधिका:यांनी दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत़ कोणत्याही प्रकारची आपत्ती कोसळण्यापूर्वीच ती होणार नाही याची सवरेतोपरी काळजी घ्या़ जबाबदारीने प्रश्न हाताळा आणि आपत्ती आलीच तर तातडीने त्याचे निवारण कसे होईल याकडे बारकाईने लक्ष देत त्यादृष्टीने आत्तापासूनच त्याचे व्यवस्थापन करा़ आपत्तीच्या काळात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर त्याचे निवारण करण्यात आपण कमी पडलो तर संबंधित विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, याचे भान ठेवून आत्तापासूनच कामाला सुरुवात करा़ आपल्या विभागातील कर्मचा:यांची बैठक घेवून त्यांनाही काही मौलिक निर्देश द्या, असेही आयुक्तांनी बैठकीतून स्पष्ट केल़े अधिका:यांना सूचना दिल्या़ महापौर कल्पना महाले यांनी गेल्याच आठवडय़ात नालेसफाईचा आढावा घेत त्याच्याशी संबंधित अधिका:यांचा बैठकीतून आढावा घेतला होता़ शहरात प्रमुख पाच नाले असून त्यांची तातडीने स्वच्छता करण्याचे काम हाती घ्या़ खोलर्पयत स्वच्छता करत असताना कच:याची सुध्दा विल्हेवाट लावा असे आदेश देवूनही परिस्थिती मात्र अद्यापही सुधारलेली नाही़
धुळ्य़ातील नालेसफाई प्रश्नी मनपा आयुक्त आक्रमक
By admin | Updated: May 19, 2017 18:05 IST