शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नगाव पं. स. गणाच्या निवडणुकीत भाजपाची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 16:14 IST

पोटनिवडणूक :  निकाल घोषीत होताच कार्यकर्ते व  विजयी उमेदवाराचा जल्लोष; कॉँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव 

ठळक मुद्देदुरंगी लढतीत भाजपाची सरशीअर्ध्या तासात निकाल हातीधुळे तालुक्याचे होते निकालाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/तिसगाव : धुळे तालुक्यातील नगाव पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी  सकाळी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा जागा राखली आहे. या निवडणुकीत भाजपाचे सुनील तुकाराम पाटील यांनी कॉँग्रेसचे उमेदवार विकास नानाभाऊ पाटील यांचा ५१६ मतांनी पराभव केला. निकाल घोषीत होताच, विजयी उमेदवारासह भाजपा कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात एकच जल्लोष केला. धुळे तालुक्यातील नगाव गावात पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या धुळे पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे या नगाव ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यामुळे त्यांनी  पं.स.सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. परिणामी, त्यांची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. दुरंगी लढतीत भाजपाची सरशी धुळे तालुक्यातील नगाव पं.स.गणाच्या पोटनिवडणुकीसाठी  माघारीच्या अंतिम दिवशी नामनिर्देशन अर्ज दाखल करणाºया दोन जणांनी माघार घेतल्याने  भाजपाचे सुनील तुकाराम पाटील आणि काँग्रेसचे विकास नानाभाऊ पाटील हे दोन जण रिंगणात होते.  त्यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. दिवसभरात नगाव येथील १२ केंद्रावर ४८ टक्के मतदान झाले होते. शनिवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.  भाजपाचे उमेदवार सुनील तुकाराम पाटील यांना २,४१६ मते तर कॉँग्रेसचे  विकास नानाभाऊ पाटील यांना १,९०० मते पडली. भाजपाच्या विजयी उमेदवाराची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवार सुनील पाटील यांच्या गळ्यात पुष्पहार घालून तहसील कार्यालयात एकच जल्लोष केला. प्रतीष्ठेच्या लढतीत भाजपाने मारली बाजी तालुक्यातील नगाव पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळींचे लक्ष लागून होते. त्यात जवाहर गटाचे तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील व सायने येथील योगेश विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसचे विकास नानाभाऊ पाटील तर ज्ञानज्योती भदाणे, मनोहर भदाणे व राम भदाणे यांच्या नेतृवाखाली मनोहर भदाणे यांचे चुलत बंधू सुनील भदाणे हे रिंगणात होते. भाजपासाठी ही लढत प्रतीष्ठेची होती. तरीही नगाव गृ्रप ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया तिसगाव-ढंढाणे, वडेल, रामनगर, सायने येथील मतदारांनी भाजपाला कौल दिला. त्यामुळे सुनील पाटील यांना विजय मिळविता आला. अर्ध्या तासात निकाल हाती तहसील कार्यालयात शनिवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.  साडे दहा वाजेपर्यंत मतमोजणीचे काम पूर्ण झाले होते.  शुक्रवारी नगाव येथील १२ केंद्रावर निवडणूक झाली होती. त्यानुसार आज मतमोजणीच्या ठिकाणी ४ टेबलावर मतमोजणी तीन फेºयांमध्ये करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी काम पाहिले. तर साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा धुळे तहसीलदार अमोल मोरे यांनी त्यांना मदत केली़ 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक