माजी मंत्री रोहिदास पाटील, संस्थेचे चेअरमन कुणाल पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांच्या प्रेरणेने महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित होत असतात. "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" या संत तुकारामांच्या उक्तीनुसार धुळे शहरातील एसएसव्हीपीएस आर्ट्स आणि कॉमर्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकाकाकडून २७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या 'माझी वसुंधरा मित्र' या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील ३२८ विद्यार्थ्यांनी आभासी पद्धतीने पर्यावरण रक्षणाची शपथ घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केले. प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांनी आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांना पर्यावरण जनजागृती या विषयावर उद्बोधन केले. या उपक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नीलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. भैय्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शपथ घेण्याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. शरद भामरे आणि डॉ.कल्पना पाटील यांनीही वसुंधरा बचाव या उपक्रमाचा लेखाजोखा घेत असताना पर्यावरण संतुलन आणि देशाचा विकास याबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मिळून या कार्यक्रमात सहभागींची संख्या ही ३४९ एवढी आहे आणि यापुढील काळातही महाविद्यालयातील बरेच विद्यार्थी आणि प्राध्यापक या उपक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी माझी वसुंधरा मित्र या प्रकल्पांतर्गत पर्यावरण रक्षणाविषयी विविध उपक्रमांचे आयोजन करू अशी इच्छा व्यक्त केली.
माझी वसुंधरा मित्र महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी घेतली आभासी शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST