जिल्ह्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांच्या स्तरावर या तीन गटांमध्ये निबंध स्पर्धा,
काव्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे दि. २५ व २६ सप्टेंबर २०२० या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही गटांमध्ये व तिन्ही उपक्रमांमध्ये प्रथम,द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रजासत्ताकदिनी धुळे येथे होत आहे. जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री ना.अब्दुल नबी सत्तार यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथील क्रीडांगण, देवपूर, धुळे येथे हा कार्यक्रम होणार आहे. इ. ९ वी ते १२ वी गटातील विद्यार्थिनी ऐश्वर्या जाधव हिने तीनही स्पर्धांत सहभाग घेतला होता. तिला चित्रकला स्पर्धेत जिल्हास्तरावर यश मिळाले असल्याची माहिती मुख्याध्यापक ए. एस. अहिरराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.