शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना नावालाच

By admin | Updated: May 15, 2017 16:11 IST

प्रचार-प्रसाराचा अभाव असल्याने शिरपूर तालुक्यातील जनता या योजनेबाबत उदासीन असल्याची बाब नुकतीच समोर आली

ऑनलाइन लोकमतशिरपूर, जि. जळगाव, दि. 15 - मुलींचा जन्मदर वाढावा, बालविवाह रोखता यावे, अशा उद्देशाने राज्यात ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही महत्त्वाकांक्षी योजना शासनाने सुरू केली़ मात्र, अटी, शर्ती  व प्रचार-प्रसाराचा अभाव असल्याने शिरपूर तालुक्यातील जनता या योजनेबाबत उदासीन असल्याची बाब नुकतीच समोर आली असून तालुक्यात वर्षभरात केवळ 131 प्रकरणांची नोंद झाली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने ‘सुकन्या’ योजना सुरू केली़ पुढे त्या योजनेचे विलीनीकरण करून 26 फेब्रुवारी 2017 रोजी शासनाच्या वतीने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू करण्यात आली़ दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील दोन्ही श्रेणीतील घटकांचा त्यात समावेश आह़ेया योजनेत दारिद्रयरेषेखालील दोन अपत्य मुलींसाठी लाभ देण्यात येणार असून, दारिद्रयरेषेवरील येणा:या मुलींनाही या योजनेचा काही प्रमाणात लाभ देण्यात येणार आह़े या योजनेत प्रधानमंत्री जनधन मुलीचे व तिच्या आईचे संयुक्त खाते बँकेत उघडण्यात येवून एक लाखाचा अपघात विमा व पाच हजार रूपयांचा ओव्हरड्रॉपचा लाभ घेता येईल़ एलआयसीकडे 21 हजार रूपयांचा विमा उतरविण्यात येवून मुलींच्या 18 वर्षे वयानंतर एक लाख रूपये विम्याची रक्कम मिळू शकते. याखेरीज नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू, कान, डोळे अवयव निकामी झाल्यास मदतीची तरतूद या योजनेत आह़े मात्र या योजनेचा लाभ  व विम्याचा लाभ घेण्यासाठी मुलगी 10 वी उत्तीर्ण व 18  वर्षार्पयत अविवाहित असणे आवश्यक आह़े योजना कुटुंबात जन्मणा:या अपत्यांपैकी दोन मुलींना लागू असेल, त्यासाठी जन्म नोंदणी प्रमाणपत्र, मुलीचे वडील महाराष्ट्रीयन असल्याची अट असून, कुटुंब कल्याण नियोजनास त्यात प्राधान्य देण्यात आले आह़े प्राप्त माहितीनुसार, ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची सुरुवात झाल्यापासून या तालुक्यात प्रकल्प क्रमांक 1 कडून 93 तर प्रकल्प क्रमांक 2 कडून 38 असे एकूण 131 प्रकरणाची नोंद असून, त्याला मार्गी लागण्यासाठीचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी या योजनेची सुरूवात झाली असली तरी प्रचार व प्रसारच्या अभावामुळे ग्रामीण भागातील जनता उदासीन दिसत आह़े या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असा सूर उमटतांना दिसतो़‘त्या’ आदेशाचे काय झाल़े़़माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माहितीचे महाराष्ट्रदिनी ग्रामसभेत प्रकट वाचन व्हावे असे आदेश महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होत़े या आदेशाचे काय झाले?  असा सवाल उपस्थित होत आहे. बहुतांश ग्रामसभेत त्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचे सांगितले जात आह़ेमाझी कन्या भाग्यश्री योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी येणा:या काळात प्रामाणिक प्रयत्नांवर आमचा भर आह़े दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील दोन्हीं श्रेणीतील मुलींच्या जन्माची नोंद घेण्याचा आमचा प्रयत्न राहील़-पी़आऱ पाटीलबालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती शिरपूर