शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

नगरपालिकेचा २६१ कोटी २९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:47 IST

दोंडाईचा । सर्वसाधारण सभेत अंदाजपत्रक एकमताने पारित

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : दोंडाईचा नगरपालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत २६१ कोटी २९ लाख रुपयांचा मंजूर करण्यात आला.सर्वसाधारण सभेत २ लाख ७५ हजार ३१३ रुपये शिलकीचे, २६१ कोटी २७ लाख १९ हजार ८७९ रुपये खर्चाचे असे २६१ कोटी २९ लाख ९५ हजार १९२ रुपयाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. एकमताने या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.दोंडाईचा नगरपालिकेच्या सभागृहात शनिवारी उपनगराध्यक्ष रवींद्र उपाध्ये यांच्या अध्यतेखाली सर्वसाधारण सभा झाली. मुख्याधिकारी डॉ.दीपक सावंत यांनी अर्थसंकल्पाबाबत माहिती सादर केली. यावेळी सभागृहात बांधकाम सभापती निखिल जाधव, कृष्णा नगराळे, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण महाजन, माजी शहराध्यक्ष संजय तावडे, शिक्षण सभापती राजेश सोनवणे, नगरसेवक नबु पिंजारी, चिरंजीवी चौधरी, मनीषा भिल, संजय मराठे, जुई देशमुख, मनीषा भिल, भरतसिंग राजपूत, नानकराम गिरीधारी, नरेंद्र कोळी, सागर मराठे, माजी नगरसेवक किशन दोधेजा, नरेंद्र गिरासे, स्वीय सहाय्यक नरेंद्र राजपूत, जितेंद्र गिरासे, हितेंद्र महाले, भरतारी ठाकूर आदी उपस्थित होते.अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक ५९ कोटी २० लाख १५ हजार ७९१ रुपये आहे. पालिकेस महसुली जमेतून, विविध करातून- ६ कोटी ७२ लाख ९५ हजार ३५४ रुपये व महसुली अनुदाने १८ कोटी ३८ लाख, खर्च प्रतिपूर्ती १२ लाख ११ हजार, रुपये, मालमत्ता भाडे १ कोटी ३३ लाख ३५ हजार रुपये, विविध फी आकार ७१ लाख ४६ हजार रुपये, निविदा व इतर ४ लाख ५५ हजार रुपये, ठेवी व्याज ३६ लाख रुपये, ना परतावा ठेवी ५० हजार रुपये, व्युपगत ठेवी ५० हजार, इतर उत्पन्न ६ लाख २५ हजार असे एकूण महसुली उत्पन्नातून २७ कोटी ७५ लाख १७ हजार ३५४ रुपये येणे अपेक्षित आहे.भांडवली जमेतून उत्पन्न १७४ कोटी ३४ लाख ६२ हजार ४७ रुपये येणे अपेक्षित आहे. महसुली जमा, भांडवली जमा, आरंभीची शिल्लक असे एकूण २६१ कोटी २९ लाख ९५ हजार १९२ रुपये अशी जमा बाजू दाखवली आहे.अंदाजपत्रकात २६१ कोटी २७ लाख १९ हजार ८७९ रुपये खर्च अपेक्षित आहे.अर्थसंकल्पात- पायाभूत सुविधांची कामे व इतर विकास कामाची तरतूद केली आहे. त्यात प्रशासकीय इमारतीवर सोलर बसविणे १ कोटी रुपये, अमरावती नदी संवर्धन, पंथ निर्मितीकरीता २५ कोटी रुपये, भुयारी गटारसाठी २ कोटी रुपये, नवीन प्रशासकीय इमारतसाठी २ कोटी रुपये, नगरपालिका शाळा सुविधा ९ लाख रुपये, वैशिष्टयपूर्ण रस्ते २५ लाख रुपये, नगरोत्त्थान रस्ते २५ लाख रुपये, खुल्या जागा विकसित करणे ५ लाख रुपये, नवीन दुकान बांधणे ५० लाख रुपये, जमिनी खरेदी करणे २ कोटी रुपये, शाळा बांधणे २० लाख, मुख्याधिकारी निवासस्थान बांधणे १० लाख रुपये, पंतप्रधान आवास योजना १० कोटी, वैयक्तिक शौचालय ५० लाख, नवीन उद्यान निर्मितीकरीता ५० लाख, घनकचरा प्रकल्पसाठी २ कोटी रुपये, भुयारी गटारसाठी २ कोटी रुपये, स्पोर्ट कॉम्प्लेक्स १० लाख रुपये, पूल व उड्डाणपूलकरिता १ कोटी रुपये, ओपनजिम ४० लाख, नाट्यगृह बांधणे १० कोटी, सायन्स पार्क १८ कोटी, शहर बस सुविधा २ कोटी, अ‍ॅमेजमेंट पार्क १० कोटी, जलतरण तलाव ५ कोटी, फिरते शौचालय ५ लाख, रमाई आवासकरिता २ कोटी रुपये खर्च होणार आहेत.महसुली खर्चावर ३२ कोटी ९१ लाख ९५ हजार ६०४ रुपये व भांडवली खर्चावर २२८ कोटी ३५ लाख २४ हजार २७५ रुपये खर्च अपेक्षित आहे. अखेरी शिल्लक २ लाख ३१३ असून २६१ कोटी रु २७ लाख १९ हजार ८७९ खर्चाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे